
Ahilyanagar NEWS : अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. गेल्या निवडणुकीमध्ये 73 गट, तर 146 गण होते. ठाकरे सरकारने 85 व 170 केली होती. शिंदे-भाजप सरकारने त्यास स्थगिती दिली होती.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रामविकास विभागाने प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. वाढीव लोकसंख्येनुसार जिल्ह्यात 75 गट व 150 गण संख्या होणार आहे. ही संख्या राज्यात सर्वाधिक आहे. राज्यात सर्वाधिक गट आता नव्याने वाढणारे गट व गण कोणत्या तालुक्यातील असतील, याची उत्सुकता आहे. वाढणारे गट अन् गण भाजपच्या फायद्याचे ठरतील, अशी चर्चा आहे. त्यासाठी गट अन् गण रचनेकडे भाजपकडून इच्छुक असलेल्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागलं आहे.
अहिल्यानगरसह राज्यातील 32 जिल्हा परिषद व 336 पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. 14 जुलैपासून प्रभाग रचना केली जाणार आहे. 18 ऑगस्टला अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोगाला (Election Commission) सादर केली जाणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी प्रभाग रचनेचे आदेश जारी केले. गेल्या तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून अहिल्यानगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका रखडल्या आहेत. सन 2017च्या निवडणुकांमध्ये जिल्हा परिषदेचे 73गट, तर पंचायत समितींचे 146गण होते. ठाकरे सरकारच्या काळात 85 गट व 170 गण केले होते. त्याला भाजप (BJP) सरकारने स्थगिती दिली होती. सर्वोच्च न्यायालयानेही गत निवडणुकीप्रमाणेच निवडणुका घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार हा कार्यक्रम आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील तालुकानिहाय ओबीसी, अनुसूचित जाती व जमातीची लोकसंख्या निश्चित करून त्याबाबतचा अहवाल सरकारला सादर केला होता. या माहितीच्या आधारे ग्रामविकास आयोगाने जिल्हा परिषद गट व गणाची प्रभाग निश्चित करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते. जुन्याच आरक्षणानुसार निवडणुका घ्याव्यात, असे न्यायालयाच्या आदेशात म्हटलेले आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रभाग रचनेच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे. अनेकांनी आतापासून राजकीय डावपेच टाकण्यास सुरुवात केलेली आहे. काही जणांनी, तर आपल्या गटासह शेजारील गटात मोर्चेबांधणी सुरु केलेली आहे. ऐनवेळी धावपळ नको म्हणून काहींनी राजकीय डावपेच टाकल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
14 जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यानी प्रारूप प्रभाग
रचनेची अधिसूचना प्रसिद्ध करणे
21 जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती व सूचना सादर करणे
28 जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त हरकतीच्या आधारे अभिप्रायासह विभागीय आयुक्तांना प्रस्ताव सादर करणे
11 ऑगस्टपर्यंत प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी घेऊन निर्णय घेणे
18 ऑगस्टपर्यंत अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोग किंवा प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडे सादर करणे.
ग्रामीण लोकसंख्या- 36 लाख 4 हजार 668
अनुसूचित जाती- 4 लाख 46 हजार 464
अनुसूचित जमाती- 3 लाख 57 हजार 453
जिल्ह्यात 14 पंचायत समिती असून 150 गण, तर 75 गट असतील. अकोले- 6 (12), संगमनेर- 9 (18), कोपरगाव- 5 (10), राहाता- 5 (10), श्रीरामपूर- 4 (8), नेवासे- 7 (14), शेवगाव-0 4 (8), पाथर्डी 5 (10), अहिल्यानगर 6 (12), राहुरी- 5 (10), पारनेर- 5 (10), श्रीगोंदे- 6 (12), कर्जत- 5 (10), जामखेड- 3 (6).
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.