Parseoni Nagar Panchayat News : श्रेय घेण्यासाठी सारेच पुढे-पुढे, रिक्त जागा भरायच्या तर एकही नाही !

Leader ; एखादे काम करायचे म्हटले की एकही पुढारी पुढे येत नाही.
Parseoni Nagar Panchayat, Nagpur.
Parseoni Nagar Panchayat, Nagpur.Sarkarnama

Nagpur District's Parseoni Nagar Panchayat News : जनतेची मागणी किंवा एखादे शासकीय काम पूर्ण झाले की त्याचे श्रेय घेण्यासाठी झाडून सारे नेते पुढे पुढे करतात. पण एखादे काम करायचे म्हटले की एकही पुढारी पुढे येत नाही. नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी नगरपंचायतीच्या बाबतीत हा अनुभव जनता घेत आहे. (People are taking this experience in the case of Nagar Panchayat)

२०१६ पारशिवनी शहराला नगरपंचायतीचा दर्जा मिळाला. त्यानंतर त्याचे श्रेय घेण्यासाठी आजी-माजी नेत्यांमध्ये श्रेयवाद रंगला होता. पण नगरपंचायतीचा दर्जा मिळून सहा वर्षे झाली, आजही अनेक पदे रिक्त आहेत. सध्या जे कारभारी आहेत, तेसुद्धा पूर्णवेळ नाहीत. पण आता एकही नेता यासाठी पुढाकार घेताना दिसत नाही.

पारशिवनीला नगरपंचायतीचा दर्जा देण्याची मागणी ऑक्टोबर २०१६ मंजूर झाल्यानंतर राजकारण्यांनी (Political Leaders) आनंदोत्सव साजरा केला होता. त्याचे श्रेय घेण्यासाठी चढाओढ लागली होती. नगरपंचायतीसोबत शहराच्या विकासासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करणेही आवश्यक होते. पण सहा वर्षे होऊनही प्रशासकीयदृष्ट्य़ा महत्वाची असलेली अनेक पदे अजूनही रिक्त आहेत. याचा परिणाम थेट विकासकामांवर होत आहे.

ही रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावी, यासाठी आता कुणी आजी-माजी लोकप्रतिनिधी का पुढे येत नाही, असा प्रश्न पारशिवनीवासी विचारत आहेत. आताही कुणी पुढाकार घेतला नाही, तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये (Elections) जनता नेत्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.

Parseoni Nagar Panchayat, Nagpur.
Nagpur NCP News : भाजपने अचानक टाकली गुगली, अन् राष्ट्रवादीची स्थिती झाली इकडे आड तिकडे विहीर !

सुमारे २० हजार नागरिकांसाठी फक्त दोन दिवस अधिकारी..

सध्या पारशिवनीचा अतिरिक्त कारभार रामटेक (Ramtek) नगरपंचायतीच्या बांधकाम अधिकाऱ्याकडे दिला आहे. आठवड्यातून दोन दिवस पारशिवनीसाठी ते देतात. शहरीकरण वाढत असल्याने बांधकाम परवानगीचे हजारो अर्ज येतात. केवळ दोन दिवसांत बांधकाम आणि त्यासंदर्भातील कामे पूर्ण करणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे विकासकामे रेंगाळत असून नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे.

Parseoni Nagar Panchayat, Nagpur.
NCP Nagpur News : नागपुरात राष्ट्रवादी कॉंग्रेस रस्त्यावर; एकच सवाल, महापुरुषांचे पुतळे का हटवले?

पाणीपुरवठ्यासाठी महिन्यातून फक्त एक दिवस..

पाणीपुरवठा हा विभाग तसा बाराही महिने अलर्ट असावा लागतो. पण आश्चर्याची बाब म्हणजे स्वच्छता आणि पाणीपुरवठ्याची व्यवस्था पाहणारा अभियंता महिन्यातून केवळ एकदा पारशिवनीला येतो. ही अतिरिक्त जबाबदारी सावनेर येथील स्वच्छता, पाणीपुरवठा अभियंत्याकडे आहे.

बांधकाम अभियंता, स्वच्छ पाणीपुरवठा अभियंता, नगररचना साहाय्यक, प्रशासकीय अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, अकाउंटंट आणि अंतर्गत लेखा परीक्षक ही महत्वाची पदे रिक्त आहेत.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com