

Nagpur Graduate Election: नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रतिज्ञापत्रातील आर्थिक माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे उमेदवार ॲड. अभिजित वंजारी यांच्या वार्षिक उत्पन्नात गेल्या पाच वर्षांत तब्बल एक कोटीची वाढ झाली आहे. भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांचेही उत्पन्न कोटीच्या पुढे गेले आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार प्रा. अनिल सोले यांचे उत्पन्न तुलनेने कमी असल्याचे प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट झाले.
वंजारी यांनी २०२१-२२ मध्ये स्वतःचे वार्षिक उत्पन्न ४६ लाख ३८ हजार ५०० रुपये असल्याचे नमूद केले होते. २०२५-२६ मध्ये हे उत्पन्न वाढून १ कोटी ५५ लाख ३९ हजार ८७० रुपये झाले आहे. त्यांच्या पत्नीचे उत्पन्नही ११ लाख ८५ हजार २८० रुपयांवरून १४ लाख ६४ हजार १७० रुपयांवर पोहोचले आहे. वंजारी यांच्याकडे ३ कोटी ८३ लाख ९६ हजार ४४६ रुपयांची चल, तर ९ कोटी ९७ लाख ९५ हजार ९६१ रुपयांची अचल संपत्ती आहे. त्यांच्यावर ५ कोटी ३० लाख ३० हजार ९३१ रुपयांचे कर्ज असून, त्यांचे शिक्षण एलएलबीपर्यंत झाले आहे.
भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या उत्पन्नातही मोठी वाढ झाली आहे. २०२१-२२ मध्ये त्यांचे वार्षिक उत्पन्न १० लाख ५४ हजार ४६० रुपये होते. २०२५-२६ मध्ये ते १ कोटी ३८ लाख २९ हजार ५२० रुपये झाले. त्यांच्या पत्नीचे उत्पन्न ९ लाख ६५ हजार ३४० रुपयांवरून ११ लाख ७० हजार ८२० रुपयांवर पोहोचले आहे. कोहळे यांच्या नावावर ३ कोटी ५८ लाख ५ हजार ७३ रुपयांची जंगम आणि ४ कोटी ३० लाख ९ हजार ४०० रुपयांची स्थावर मालमत्ता व पत्नीच्या नावावर अनुक्रमे १ कोटी ६८ लाख ५६ हजार १२२ आणि १ कोटी ४५ लाख ५७ हजार ४६८ रुपयांची मालमत्ता आहे. त्यांच्यावर ४० लाख ६२ हजार ७७१ रुपयांचे कर्ज आहे. त्यांचे शिक्षण बी.एससी, बी.एड. झाले आहे.
नागपूरचे भाजपचे बंडखोर उमेदवार प्रा. अनिल सोले यांचे वय ६७ वर्षे असून, त्यांचे वार्षिक उत्पन्न १९ लाख ३१ हजार ६१० रुपये, तर पत्नीचे उत्पन्न १७ लाख ४१ हजार १३० रुपये आहे. त्यांच्या नावावर ९५ लाख ९१ हजार १३६ रुपयांची जंगम आणि ९३ लाख ७० हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. पत्नीच्या नावावर ४२ लाख ९८ हजार ९१७ रुपयांची जंगम आणि ४४ लाख ८० हजार ६२५ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. ते गणितात एम.एससी. झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.