Nagpur Crime: भयानक! वेगळ्या राहणाऱ्या पत्नीने मागितला मुलीचा ताबा; चिडलेल्या पित्याकडून त्याच चिमुकलीचा केला खून

Nagpur Crime: नागपूरमध्ये घडलेल्या या घटनेनं अवघा महाराष्ट्र हादरला आहे. ही बातमी कळताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Nagpur Crime
Nagpur Crime
Published on
Updated on

Nagpur Crime: महाराष्ट्रात पित्याकडून चिमुकलीचा खून करण्यात आल्याची भयनाक घटना घडली आहे. केवळ पत्नीनं मुलीचा ताबा मागितल्यानं चिडलेल्या बापानं हे अमानुष कृत्य केलं आहे. नागपूरमध्ये घडलेल्या या घटनेनं अवघा महाराष्ट्र हादरला आहे. ही बातमी कळताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Nagpur Crime
BJP Politics: भाजपकडून वाल्मिक कराडच्या अत्यंत विश्वासू व्यक्तीची जामखेडच्या स्वीकृत नगरसेवकपदी नेमणूक! तुषार आपटे प्रकरणाची पुनरावृत्ती का?

नेमकं काय घडलं?

नागपूरच्या वाठोडे येथील सरोदेनगर परिसरात बुधवारी पहाटे ही धक्कादायक घटना घडली. बुधवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास मुलीने प्यायला पाणी मागितलं. यावेळी रात्री दारूच्या नशेत असणाऱ्या नराधम बापानं रागाच्या भरात चाकू तिच्या छातीत खुपसला. पत्नीने मुलीचा ताबा मागितल्याच्या त्याचं आठ वर्षांच्या मुलीचा खून या बापानं केला आहे.

Nagpur Crime
Chandrashekhar Bawankule: भाजप मंत्री बावनकुळेंच्या ठाकरे बंधूंना संक्रांतीच्या शुभेच्छा! म्हणाले,निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव व राज...?

धनश्री शेंदरे असं मृत मुलीचं नाव आहे. तर शेखर शेंदरे असं तिच्या जन्मदात्या नराधममाचं पित्याच नाव आहे. धनश्री (वय, ८ वर्षे) आपलया आजी आणि वडिलांसोबत राहत होती. पत्नी शुभांगीसोबत मुलीच्या ताब्यावरून दीर्घकाळ वाद सुरू होता. पत्नी त्याच्यापासून वेगळी राहत होती, मुलीला भेटण्यासाठी ती लपून यायची. मुलीची आईकडं जाण्याची ओढ आरोपीसाठी वादाचं कारण ठरली. कारण मुलीचा ताबा तिच्या आईकडं देण्यास आरोपी पित्याचा तीव्र विरोध होता.

Nagpur Crime
Latur NCP : नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विजय खेचून आणला, पण नियतीनं तो आनंद काही दिवसांतच हिरावला

दरम्यान, या अमानुष घटनेनंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली धनश्री मदतीसाठी रडत होती. यानंतर तिच्या आजी आणि काकांनी तातडीनं पोलिस ठाणं गाठलं नंतर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पण तोवर डॉक्टरांनी धनश्रीला मृत घोषित केलं. कुसुमबाई शेंदरे यांच्या तक्रारीवरून वाठोडा पोलिस ठाण्यात नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर पोलिसांनी आरोपी शेखर शेंदरेला अटक केली. पण या दुर्देवी घटनेमुळं घटनेने संपूर्ण परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. आरोपी हा प्रचंड दारूच्या आहारी गेलेला व्यक्ती असून आपल्या पत्नीवर तो कायम संशय घ्यायचा तसंच तिला मारहाणही करत होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com