Hit And Run Case : पुण्यानंतर फडणवीसांच्या नागपुरात हिट अ‍ॅन्ड रन केस; मद्यधुंद कारचालकाने तिघांना उडवलं

Devendra Fadnavis : पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील घडलेल्या हिट अ‍ॅन रन प्रकरणामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावरून विरोधक गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य करत आहेत. त्यातच फडवीसांच्या नागपुरातच हिट अ‍ॅन्ड रनचा प्रकार घडला आहे.
Nagpur Hit And Run Case
Nagpur Hit And Run Case Sarkarnama

Nagpur Crime News : पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील घडलेल्या हिट अ‍ॅन रन प्रकरणामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावरून विरोधक गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य करत आहेत. त्यातच फडवीसांच्या नागपुरातच हिट अ‍ॅन्ड रनचा प्रकार घडला आहे. Nagpur Hit And Run Case

नागपुरातील Nagpur झेंडा चौकात मद्यधुंद कारचालकाने तीन जणांना धडक दिली. यात एका बाळाचाही समावेश असल्याची माहिती आहे. घटनेनंतर कारमधील चार जणांपैकी तिघे पळाले. तर एकाला नागरिकांनी पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. एकाच आठवड्यात राज्यात दोन हिट अ‍ॅन्ड रनच्या दोन घटनेमुळे राज्यातील गृहविभाग नेमके करतेय तरी काय, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

सध्या पुण्यातील हिट अ‍ॅन्ड रनचे प्रकरणावरून राज्यभरातून पोलिसांच्या कारभाराचे वाभाडे काढले जात आहे. पोलिसांच्या या कारभाराअडून विरोधकांनी गृहमंत्री फडणवीसांची Devendra Fadnavis कोंडी करण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण ताजे असतानाच फडणवीसांच्या नागपुरातच मद्यधुंद कारचालकाने पायी चाललेल्या एका जोडप्याला जोरदार धडक दिली. यात बाळासह जोडप्याला दुखापत झाल्याची माहिती आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nagpur Hit And Run Case
Pune Hit And Run Case : पुणे अपघातप्रकरणी तपासाबाबत पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय

नागपूरच्या महाल भागातील झेंडा चौकात झालेल्या या अपघातानंतर कारमधील तिघांनी पळ काढला. तर एका तेथील जमावाला पकडून ठेवण्यात यश आले. त्याला चोप देत जमावाने पोलिसांच्या ताब्यात दिले. ते सर्वजण मद्यधुंद असल्याची प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तर जखमी जोडप्याला नागरिकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

(Edited by Sunil Dhumal)

Nagpur Hit And Run Case
Irrigation Department News : जलसंपदा विभागाविरोधात भरत पाटणकर, आमदार लाड एकवटले; दिला मोठा इशारा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com