Pune Hit And Run Case : पुणे अपघातप्रकरणी तपासाबाबत पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय

Pune Police Commissioner : आयुक्तांनी येरवडा पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी यांना तडकाफडकी निलंबित केले. त्यांच्यावर तपासात दिरंगाई आणि अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना दिली नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
Pune Hit And Run Case
Pune Hit And Run CaseSarkarnama

Pune Porsche Car Accident News : पुण्यातील कल्याणीनगर येथे अल्पवयीन मुलाने पोर्श कारने दोन तरुणांचा जीव घेतला. या प्रकरणी पोलिसांनी अक्षम्य चुका केल्याचा आरोप होत आहे. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या येरवडा पोलिसांनी घटनेबाबत कंट्रोल रुमला माहिती दिली नसल्याचे पुढे आहे आहे. यातून येरवडा पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना दोघांचे तडकाफडकी निलंबन केले. त्यानंतर या प्रकरणी तपासाबाबतही पुणे पोलिस आयुक्तांनी मोठा निर्णय घेतला आहे. करण्यात आले आहे. Pune Hit And Run Case

या घटनेतील अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी स्थानिक आमदाराने पोलिसांवर दबाव आणला, तसेच पोलिसांनीही आरोपीस वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याचे आरोप झाले आहे. त्यानतंर आयुक्तांनी येरवडा पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी यांना तडकाफडकी निलंबित केले. त्यांच्यावर तपासात दिरंगाई आणि अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना दिली नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यानतंर या प्रकरणाचा तपास थेट गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

दरम्यान, अपघात प्रकरणातील अल्पवीयन मुलाचे वडील विशाल अगरवाल Vishal Agarwal यांच्यावर पुरावे नष्ट केल्याच्या आरोपातून गुन्हा दाखल झाला होता. अटकेनंतर त्यांची तीन दिवसाच्या पोलिस कोठडीची (Police Custody) मुदत शुक्रवारी संपली. त्यानंतर विशाल अगरवाल यांना शनिवारी (ता. २४) कोर्टासमोर हजर केले असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यानंतर आयुक्तांनी घेतलेल्या मोठ्या निर्णयांमुळे पुणे पोलिसांत एकच खळबळ उडाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pune Hit And Run Case
Pune Hit And Run Case : वेळेत माहिती न कळवणं भोवलं; पुणे अपघातप्रकरणी पोलिस आयुक्तांची मोठी कारवाई, दोघांचं निलंबन

या प्रकरणातील अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केल्याचे आरोप होत आहेत. त्यावरून पुणेकरांसह काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांनी Ravindra Dhangekar जोरदार टीका केली. या प्रकरणातून पुणे पोलिस आयुक्तांनी पुण्याची बदनामी केल्याचा आरोप करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. यामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Pune Hit And Run Case
Arvind Kejriwal News : दिल्लीनंतर भाजपची 'या' राज्यांकडे वक्रदृष्टी; केजरीवालांचा मोठा आरोप

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com