Nagpur : महानगरपालिका हातून गेली, तर भाजपला लोकसभा जिंकणे अवघड; म्हणून...

Election : कार्यक्रमांचा धडाका पाहता मनपा निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
Nagpur Municipal Corporation
Nagpur Municipal CorporationSarkarnama
Published on
Updated on

राज्याच्या सत्तासंघर्षात विजय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचा झाला. या लढ्यात भाजप शिंदेंसोबत खांद्याला खांदा लावून लढली. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता फार काही बदल होतील, असे वाटत नाही.

या सर्व घडामोडींमुळेच महानगरपालिका निवडणुका आता लवकरच होतील, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे आणि नागपुरात भाजपकडून जे कार्यक्रम घेतले जात आहेत, त्यावरूनही जाणकारांच्या वक्तव्याची पुष्टी होती. शिवसेना व धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला दिल्यानंतर भाजपचा नागपूर शहरात सुरू असलेला कार्यक्रमांचा धडाका पाहता मनपा निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

उद्‍घाटन, भूमिपूजन, लोकप्रिय घोषणांच्या माध्यमातून निवडणुकीचा माहोल तयार करण्याची भाजपची पद्धत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. महाशिवरात्री व शिवजयंतीनिमित्त गल्लीबोळात झालेल्या जेवणावळी आणि महाप्रसादाचे बहुतांशी कार्यक्रम पुरस्कृत होते. इतक्या मोठ्या प्रमाणात जेवणावळीचे कार्यक्रम यापूर्वी होत नव्हते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकसभा कायम राखायची आहे.

महापालिका हातून गेली तर लोकसभा जिंकणे सोपे राहणार नाही, याची जाणीव त्यांना आहे. त्यामुळे राज्यातील गोंधळाकडे त्यांनी दुर्लक्ष करून आपल्या कार्यक्रमांचा धडाका सुरू ठेवला आहे. सांस्कृतिक, क्रीडा, ज्येष्ठांसाठी सांस्कृतिक महोत्सव घेतले. दिव्यांग पार्कचे भूमिपूजन करून दक्षिण नागपूरमध्ये दिव्यांगांसाठी स्टेडियम उभारण्याची त्यांनी घोषणा केली. देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असल्याने भरघोस निधी शहरात ओतला जात आहे. जी-२० परिषदेचा माध्यमातून विकास कामे व शहराच्या सौंदर्यीकरणात भर घातली जात आहे.

Nagpur Municipal Corporation
BJP News : भाजपाची पुण्यात मोठी खेळी, 'या' मानकरांवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी

ही सर्व मशागत महापालिका निवडणुकीसाठी केली जात आहे. हे बघता येत्या दोन ते तीन महिन्यांत महापालिकेची निवडणूक जाहीर होऊ शकते, असे मनपाच्या एका अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. भाजपला मुंबई आणि नागपूर महापालिका कुठल्याही परिस्थितीत जिंकायची आहे. मुंबईसाठी शिवसेनेचा मोठा अडथळा दूर करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिला.

फाटाफुटीची शक्यता..

सत्ता संघर्षावर तडकाफडकी निर्णय होण्याची शक्यता कमीच दिसते. अशा परिस्थिती मनपा (Municipal Corporation) निवडणूक जाहीर झाल्यास महाविकास आघाडीतही (Mahavikas Aghadi) फाटाफूट होण्याची शक्यता जास्त आहे. शिक्षक व पदवीधर निवडणुकीत काँग्रेसमध्ये मोठे मतभेद उफाळून आले होते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना हटविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ते कायम राहिले तर वादही कायमच राहणार आहेत. काँग्रेसमधील तिकीट वाटपाच्या वेळी होणारी ओढाताण आणि मतभेद सर्वांनीच जवळून पाहिले. नेत्यांमधील संबंध अद्याप ताणलेले आहेत. हे बघता तिकीट वाटप पद्धतीत काही सुधारणा होईल, असे दिसत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com