BJP News : भाजपाची पुण्यात मोठी खेळी, 'या' मानकरांवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Shivaji Mankar News : भारतीय जनता पार्टीच्या 'फ्रेंड्स ऑफ बीजेपी' अभियानाच्या 'प्रदेश सहसंयोजक'पदी शिवाजी माधवराव मानकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Shivaji Mankar, Chandrasekhar Bawankule
Shivaji Mankar, Chandrasekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Pune News : भारतीय जनता पार्टीच्या 'फ्रेंड्स ऑफ बीजेपी' अभियानाच्या 'प्रदेश सहसंयोजक'पदी शिवाजी माधवराव मानकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी या नियुक्तीचे पत्र मानकर यांना दिले. फ्रेंड्स ऑफ बीजेपी या अभियानाच्या माध्यमातून राज्यात आणि विशेषतः पुणे जिल्ह्यात अभियानाचे संघटन अधिक सशक्तपणे वाढवण्याची जबाबदारी मानकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

मानकर यांच्यावर राज्याची जबाबदारी दिली असताना त्याचा मोठा फायदा भाजपाला कसबा पोटनिवडणुकीत होण्याची शक्यता आहे. कारण मानकर यांचे कसबा विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांचे जाळे असून त्यामाध्यमातून भाजपाला बळ मिळेल, असा अंदाज बांधला जात आहे. शिवाय चिंचवड विधानसभा मतदारसंघातही सध्या सुरू असलेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या संपर्काचा फायदा पक्षाच्या उमेदवारांना होऊ शकतो.

Shivaji Mankar, Chandrasekhar Bawankule
BJP News; भाजपच्या खासदारांनी `या`साठी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर!

फ्रेंड्स ऑफ बीजेपीच्या माध्यमातून पार्टीला मानणारे पण थेट राजकारणात येऊ न शकणारांची मोट बांधली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मिशन २०२४' ला बळ देण्यासाठी भाजपा ही मोहिम राबवत आहे. त्यात मानकर यांना स्थान दिले आहे. या माध्यमातून संघटन कौशल्य उभा करताना सोशल मीडिया वॉरियर्स तयार करण्याची जबाबदारीही, मानकर यांच्याकडे देण्यात आली आहे.

Shivaji Mankar, Chandrasekhar Bawankule
Shivsena : ठाकरेंना आणखी एक धक्का; विधीमंडळ कार्यालयपाठोपाठ आता संसदेतील कार्यालयही शिंदे गटाकडे

२०१४ ला लढली होती विधानसभा!

मानकर यांनी माजी मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. पक्षाने ऐनवेळी दिलेली जबाबदारी स्वीकारत त्यांनी येवल्याचा किल्ला लढवला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com