Nagpur Lok Sabha constituency 2024: नितीन गडकरींना मताधिक्क्यांचा आकडा गाठणे अवघड?

Nitin Gadkari News Lok Sabha Election 2024: काँग्रेसचे नेते,दलित व मुस्लिमांसोबतच हलबा समाजाची नाराजी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी असलेली नाराजी बघता गडकरींना मताधिक्क्यांचा आकडा गाठणे अवघड असल्याचे बोलले जाते.
Nitin Gadkari News Lok Sabha Election 2024:
Nitin Gadkari News Lok Sabha Election 2024:Sarkarnama

Nagpur News, 30 May: लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निकालाला चार दिवस बाकी आहे, कोण निवडून येणार यावर आकडेमोड सुरु आहे. विजयाचे दावे केले जात आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री नितीन गडकरी यांचे मताधिक्य कमी होणार असल्याची चर्चा नागपुरात सुरु आहे.

खुद्द गडकरी (Nitin Gadkari) यांनी पाच लाखांच्या मताधिक्यांनी निवडून येण्याचा दावा केला असला तरी या निवडणुकीत मतदान दोन टक्क्यांनी वाढले आहे. विकास ठाकरे यांच्यासाठी एकत्र आलेले काँग्रेसचे नेते, दलित व मुस्लिमांसोबतच हलबा समाजाची नाराजी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी असलेली नाराजी बघता गडकरींना मताधिक्क्यांचा आकडा गाठणे अवघड असल्याचे बोलले जाते.

Nitin Gadkari News Lok Sabha Election 2024:
Pune Hit And Run Case: सापडला तरच चोर.. अन्यथा शिफारसपत्रांचा खेळ जुनाच

गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत नितीन गडकरी यांनी काँग्रेसचे नाना पटोले यांना धुळ चारली होती. त्यावेळी सुमारे दोन लाख १६ हजारांचे मताधिक्य त्यांनी घेतले होते. यावेळी गडकरी यांनी पाच लाखांच्या मताधिक्यांनी निवडून येण्याचा दावा केला आहे. २०१९च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला मिळणाऱ्या मतांचा टक्का घसरला आहे. या लोकसभा निवडणुकीत टक्का घसरला तर गडकरींना कुठल्या विधानसभेतून कमी मतदान झाले,

"नितीन गडकरी यांचा पराभव व्हावा यासाठी देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी प्रयत्न केला असा आरोप ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. हा आरोप भाजप, शिंदे गटातील नेत्यांनी खोडून काढला आहे. राऊतांचा आरोपात तथ्य नाही, असे शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलंय.

"गडकरींचा पराभव होणं शक्य नाही. त्यांनी देशात अनेक मोठी कामं केलीत. परंतु, संजय राऊत यांना महायुतीत किंवा भाजपा पक्षात काहीतरी बेबनाव आहे, असं दाखवायचं. हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. महायुतीत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी समन्वयानं काम केलंय. तिघांनीही महायुतीचे उमेदवार कसे निवडून येतील, यासाठी काम केलंय. त्यामुळं महायुतीत निश्चितच आलबेल आहे," असा विश्वास संजय शिरसाठ यांनी यावेळी व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा २०१९

द.पश्चिम ५३.८२

दक्षिण ५३.१२

पूर्व ५७.२१

मध्य ५५.५५

पश्चिम ५४.०२

उत्तर ५४.७४

विधानसभा २०१९

द.पश्चिम ४९.३४

दक्षिण ५०.०८

पूर्व ५३.०६

मध्य ५०.०८

पश्चिम ४९.०३

उत्तर ५१.०६

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com