Nagpur Lok Sabha Result 2024
Nagpur Lok Sabha Result 2024Sarkarnama

Nitin Gadkari: नागपुरात गडकरींना फडणवीसांपेक्षा खोपडेच ठरले फायदेशीर

Nagpur Lok Sabha Result 2024:पहिल्या फेरीपासूनच नितीन गडकरी आघाडीवर होते. मात्र, पाचव्या फेरीअखेर ठाकरे यांनी सहा हजार मतांची आघाडी घेऊन धाकधूक वाढविली होती. पण, त्यानंतर गडकरी यांनी ही आघाडी मोडून काढत विजय संपादन केला.

Nagpur News: देशात प्रतिष्ठेच्या ठरलेल्या नागपूर मतदारसंघामधून केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांचा त्यांनी पराभव केला.

गडकरी यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघातून (Nagpur Lok Sabha) मोठे लीड मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र जेमतेम ३३ हजार येथून लीड मिळाल्याने फडणवीस अन् भाजपसाठी ही धोक्याची घंटा मानली जाते.

फडणवीस यांनी आपल्या मतदारसंघातून गडकरींना (Nitin Gadkari) ३३ हजार मतांचे लीड मिळवून दिले. तर आमदार कृष्णा खोपडे यांच्या पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघाने गडकरी यांना सर्वाधिक ७३ हजारांचे लीड मिळवून दिले. गडकरींनी फडणवीसांपेक्षा अधिकचे लीड खोपडे यांनी मिळवून दिले. त्यामुळे नागपुरात फडणवीसांपेक्षा खोपडेचे भारी ठरले.

पहिल्या फेरीपासूनच नितीन गडकरी आघाडीवर होते. मात्र, पाचव्या फेरीअखेर ठाकरे यांनी सहा हजार मतांची आघाडी घेऊन धाकधूक वाढविली होती. पण, त्यानंतर गडकरी यांनी ही आघाडी मोडून काढत विजय संपादन केला.

दक्षिण-पश्चिम या मतदारसंघाची निर्मिती झाली तेव्हापासून सलग तीन वेळा फडणवीस येथून जिंकून आले आहेत. विकास ठाकरे, प्रफुल गुडधे आणि आशिष देशमुख यांना त्यांनी पराभूत केले आहे.

Nagpur Lok Sabha Result 2024
Vishal Patil: अब इस्लामपूर दूर नहीं; विशाल पाटील कुणाचा काटा काढणार

पाच वर्षे मुख्यमंत्री असताना सर्वाधिक विकास निधी याच मतदार संघात देण्यात आला होता. शहरातील सर्वाधिक विकसित मतदारसंघात दक्षिण पश्चिमचा समावेश होतो. भाजप आणि संघाचेही मोठे नेटवर्क येथे आहे. याच मतदार संघातून भाजपने आतापर्यंत शहराला तीन महापौर दिले.

गडकरी स्वतः याच मतदारसंघात मागील पाच वर्षांपासून राहायला आहेत. असे असतानाही भाजपला येथे पक्की पकड निर्माण करता आली नाही. मागील विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांना ४९ हजार मतांचे मताधिक्य येथून मिळाले होते. किमान तेवढेही भाजपला राखता आले नाही.

सहा महिन्यांवर विधान सभेची निवडणूक येऊन ठेपली आहे. मताधिक्यांची होत चाललेली उतरंड भाजपची चिंता वाढवणारी आहे. या मतदार संघातील भाजपची पकड सैल होत असल्याने भाजपला आता नव्याने बांधणी करावी लागणार आहे. लोकसभेच्या निकालाने काँग्रेसमध्ये उत्साह संचारला आहे. येथून फडणवीस यांच्या विरोधात लढण्यास इच्छुकांमध्ये मोठी वाढ होऊ शकते. प्रफुल गुडधे पुन्हा तयारीला लागले आहेत.

आमदार कृष्णा खोपडे यांच्या पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघाने गडकरी यांना सर्वाधिक ७३ हजारांचे मताधिक्य मिळवून दिले. गडकरी यांच्या विजायात सर्वाधिक मोठा वाटा पूर्वचा आहे. पश्चिम नागपूरचे आमदार असतानाही विकास ठाकरे येथून आपल्या मतांचा टक्का वाढवू शकले नाही. असे असले तरी त्यांनी मागील निवडणुकीच्या तुलनेतील गडकरी यांची लीड सुमारे २२ हजार मतांनी कमी केली.

भाजपचे आमदार मोहन मते यांच्या दक्षिण नागपूरमधून २९ हजार, विकास कुंभारे यांच्या मध्य नागपूरमधून २५ हजारांचे मताधिक्य दिले. काँग्रेसच्या विकास ठाकरे यांना उत्तर नागपूर मतदार संघाने सर्वाधिक ४५ हजाराचे मताधिक्य दिले. उत्तरमध्ये गडकरी यांना सर्वाधिक फटका बसला. गडकरी यांचेसुद्धा मताधिक्य कमालीचे घटले आहे.

यापूर्वीच्या दोन्ही निवडणुकीत त्यांनी अनुक्रमे तीन लाख आणि सव्वादोन लाखांचे मताधिक्य मिळवले होते. यावेळी त्यांनी पाच लाखांच्या मतांनी विजयाचे लक्ष्य ठेवले होते. मात्र दीड लाखांचेही त्यांना मताधिक्य मिळाले नाही. लोकसभेच्या विधानसभानिहाय निकालाची आकडेवारी बघता आगामी विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला उत्तर आणि पश्चिममध्ये धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com