गेल्या दोन दशकापासून ( 2009 वगळता ) रामटेक लोकसभा मतदारसंघ ( Ramtek Lok Sabha Constituency ) शिवसेनेकडे आहे. शिवसेनेचा ( Shivsena ) हा गड तहाच्या माध्यमातून भाजपने आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी व्यूहरचनाही आखण्यात आली. पण, अडून बसलेल्या शिवसेनेच्या वरिष्ठांनी ( मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ) भाजपचा ( Bjp ) मनसुबा हाणून पाडला. त्यामुळे यंदा रामटेकला गळाला लावण्याची भाजपची संधी हुकली आहे. पण, मर्जीतील शिलेदार नेमण्यात भाजपला यश मिळालं आहे.
या वेळी रामटेकमध्ये ( Ramtek Lok Sabha Constituency ) परंपरागत काँग्रेसकडून ( Congress ) प्रमुख हल्ला होणार आहे. त्यामुळे रामटेकच्या गडावर झेंडा फडकविण्यात काँग्रेस की शिवसेनेला ( Shivsena ) यश मिळतं, हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
1999 पासून रामटेक मतदारसंघ ( Ramtek Lok Sabha Election 2024 ) हा शिवसेनेकडे आहे. सलग दोन वेळा येथून सुबोध मोहिते विजयी झाले. पण, शिवसेनेचे तत्कालीन नेते नारायण राणे यांनी बंड करीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्याबरोबत मोहितेही काँग्रेसमध्ये आले. मात्र, पोट निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. रामटेकचा गड प्रकाश जाधव यांनी राखला. त्यानंतर निवडणुकीच्या काँग्रेसच्या मुकुल वासनिक यांनी या गडावर झेंडा फडकविला.
पण, 2014 च्या निवडणुकीत कृपाल तुमाने ( Krupal Tumane ) या शिलेरादाराच्या मतदीनं शिवसेनेनं स्वारी केली आणि गडावर पुन्हा भगवा फडकविला. 2019 च्या निवडणुकीतही शिवसेनेनेचं निवडणुकीचे युद्ध जिंकले. कृपाल तुमानेंच्या नेतृत्वातच लढ्याला यश आले. परंतु, आता तुमानेंच्या विरोधात वातावरण आहे. त्यांना तिकीट दिल्यास गड हातातून जाईल, असा निष्कर्ष भाजपच्या रणनीतीकारांनी काढला.
शिवसेनेपेक्षा भाजपचे वातावरण पोषक असल्यानं हा गड द्यावा, अशी बोलणी भाजपकडून करण्यात आली. त्यासाठी आवश्यक फिल्डिंगही लावली. पण, बंडाच्या वेळेस याच गडावरून रसद मिळाल्याने मुख्यमंत्री शिंदे यास तयार झाले नाही. त्यामुळे हा गड भाजपच्या हाताला लागला नाही. पण, भाजपला त्यांचाच गडी शिवसेनेचा गड राखण्यासाठी पाठवण्यात यश आले. त्यामुळे यंदाची संधी हुकली, तरी पुढच्या वेळेस मात्र हा गड भाजपकडे येईल, अशी चर्चा आतापासूनच होत आहे.
रामटेकचा गड न मिळाल्याने भाजपच्या एका गोटातही नाराजी आहे. त्यामुळे त्यांच्या फितुरीचा फायदा काँग्रेसला गड काबीज करण्यासाठी होईल, अशी चर्चा रंगली आहे. पण, ही चर्चा प्रत्यक्षात किती खरी, किती खोटी हे निकालानंतर समोर येईल.
( Edited By : Akshay Sabale )
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.