Nagpur Municipal Corporation: शिंदे-फडणवीसांच्या पहिल्याच अर्थसंकल्पातून नागपूर महानगरपालिका होणार मालामाल !

Nandagram Scheme : नंदग्राम योजनेसाठी १०४ कोटी मिळण्याचाही मार्ग मोकळा होणार आहे.
Devendra Fadanvis and Eknath Shinde.
Devendra Fadanvis and Eknath Shinde.Sarkarnama
Published on
Updated on

Shinde-Fadnavis' first budget : यावर्षी नागपूर महानगरपालिकेची निवडणूक होणे अपेक्षित आहे. त्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पात नागपूरसाठी भरघोस निधी देण्याचे नियोजन शिंदे-फडणवीस यांच्या सरकारने केलेले आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नागपूरला विशेष अनुदान मिळत होते, तेसुद्धा पुन्हा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पानंतर आता राज्याच्या अर्थसंकल्पाचे वेध लागले आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प राहणार आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या नंदग्राम योजनेसाठी १०४ कोटी मिळण्याचाही मार्ग मोकळा होणार आहे. यामुळे महापालिका या अर्थसंकल्पातून मालामाल होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

महापालिकेच्या उत्पन्नाचे स्त्रोत मर्यादित असून राज्य सरकारच्या जीएसटी व इतर अनुदानावरच महापालिकेची मदार आहे. राज्य सरकारकडे मलेरिया-फायलेरिया विभागाच्या वेतनासह एकूण पाचशे कोटी रुपये थकीत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार असताना या पाचशे कोटींसाठी तगादा लावण्यात आला. परंतु महापालिकेला मिळाले नाही. आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याने राज्याच्या अर्थसंकल्पाकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

विशेष म्हणजे नुकतीच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके यांनी महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त व विविध विभागप्रमुखांसोबत मागील पंधरवड्यात बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी महापालिकेचे प्रकल्प, उपक्रम, अनुदान, रखडलेला निधी आदींची माहिती घेतली.

Devendra Fadanvis and Eknath Shinde.
Eknath Shinde News; मुख्यमंत्र्यांची उत्तर महाराष्ट्रात राजकीय साखरपेरणी!

देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या प्रकल्पांबाबत एक बैठक घेऊन अनेक प्रकल्पांना मंजुरी दिली होती. या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेले नागपुरातील प्रकल्प, त्यासाठी लागणारा निधी आदीवरही चर्चा झाली. राज्य सरकारच्या अर्थसंकल्पातून महापालिकेला काय अपेक्षित आहे, यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्राने सांगितले. आयुक्तांनी मलेरिया-फायलेरिया विभागाच्या वेतनासंबंधी थकीत निधीसह विशेष अनुदानाबाबत या बैठकीत चर्चा केली. याशिवाय गेल्या दहा वर्षांपासून रखडलेल्या गायींच्या गोठ्यांच्या नंदग्राम योजनेसाठी १०४ कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय सिमेंट रस्त्यांचा थकीत निधी, ऑरेंज सिटी स्ट्रिटसह विशेष अनुदानही मिळण्याची शक्यता आहे.

Devendra Fadanvis and Eknath Shinde.
Devendra Fadanvis; नेतृत्व डोक्यात गेले तर आपली काँग्रेस होईल!

नागपूरकरांचेही लागले लक्ष..

येत्या ९ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प (Budget) सादर करण्यात येणार आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) मुख्यमंत्री असताना त्यांनी शहरात स्मार्ट स्ट्रिट, सुरेश भट सभागृहासाठी निधी दिला होता. आता ते वित्तमंत्रीही असल्याने महापालिकेलाच (Municipal Corporation) नव्हे तर शहरातील नागरिकांचेही लक्ष लागले आहे. २७ फेब्रुवारीपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार असून ते २५ मार्चपर्यंत चालणार आहे. अधिवेशनाची सुरुवात २७ फेब्रुवारी रोजी राज्यपालांच्या अभिभाषणाने होणार आहे.

या प्रकल्पांना मिळणार ‘बूस्ट’

- नंदग्राम योजना

- सक्करदरा तलाव सौंदर्यीकरण

- सोनेगाव तलाव सौंदर्यीकरण

- विसर्जन टॅंक

- इंटिलिजंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टिम

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com