Nagpur NCP News : अनिल देशमुख ॲक्टिव्ह मोडवर, संघटना बांधणीला केली सुरुवात; शपथपत्र गोळा करणे सुरू !

Anil Deshmukh : नवीन जिल्हाध्यक्षांची निवड केली जाणार आहे.
Anil Deshmukh
Anil DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar's Group News : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये इतिहासातील सर्वात मोठे बंड अजित पवार यांनी केले. त्यानंतर शरद पवार यांनी नव्याने संघटना बांधणीला सुरुवात केली आहे. अजित पवार गेल्यानंतर जे नेते शरद पवारांसोबत राहिले, त्यामध्ये माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांचा समावेश आहे. देशमुख आता विदर्भात संघटना बांधणीसाठी फिरणार आहेत. (Deshmukh will now travel to Vidarbha for organization building)

पहिल्या टप्प्यात विदर्भातील वर्धा, गडचिरोली, अमरावती, अकोला, वाशीम जिल्ह्यात दौरा करून कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार आहेत. नवीन जिल्हाध्यक्षांची निवड केली जाणार आहे. कार्यकर्त्यांनी जमा केलेले शपथपत्र एकत्र करणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात विदर्भाच्या इतरही जिल्‍ह्यांत जाणार असल्याचे अनिल देशमुख यांनी आज (ता. १२) सकाळी नागपुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आम्ही शरद पवार यांच्या पाठीशी आहोत, असं शपथपत्र कार्यकर्त्यांकडून घेतले जात आहेत. या दौऱ्यात कार्यकर्त्यांची मतं जाणून घेणार आहे. त्यानंतर जिल्हाध्यक्ष नेमले जाणार आहेत, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली. पक्ष म्हणून सर्व कार्यालय ट्रस्टच्या नावाने केलेय. यासाठी प्रफुल्ल पटेल यांनीच पुढाकार घेतला होता, असेही ते म्हणाले.

माझ्यावर नाराजी असेल तर मी मागे होतो, पण तुम्ही या असं आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना केलं होतं. आव्हाडांनाही अजित पवारांनी प्रतिसाद दिला नाही. आता त्यांनी शपथ घेऊन ११ दिवस झाले पण खातेवाटप झालं नाही. लवकरात लवकर खातेवाटप व्हावं, आणि सरकारने कामाला लागावं. जनतेची कामं करावी, अशी अपेक्षा देशमुखांनी व्यक्त केली.

Anil Deshmukh
Anil Deshmukh News : वारकऱ्यांची काळजी घेत आहेत, चांगले आहे, पण शेतकऱ्यांचा कापूस घरातच; त्याचे काय?

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नागपुरात (Nagpur) शहर आणि ग्रामीणचे कार्यालय आहे. या कार्यालयावर शरद पवार गटाचा ताबा आहे. दुसरीकडे अजित पवारांसोबत गेलेले नेते प्रशांत पवार यांनी त्यांच्या बजाज नगर परिसरातील कार्यालयात अजित पवार गटाचे कार्यालय सुरू केले आहे. तेथे दिवसेंदिवस कार्यकर्त्यांची रीघ वाढत आहे.

वासवी लॉन येथे अजित पवार (Ajit Pawar) गटाचे अधिकृत कार्यालय असेल, असे प्रशांत पवार यांनी घोषित केले आहे. अजित पवारांसोबत गेलेले नेते यापूर्वीच ॲक्टिव्ह झालेले आहेत. तर अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी आता संघटन बांधणीला सुरुवात केली आहे. कोणत्या गटाला अधिक प्रतिसाद मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com