Devendra Fadnavis : "त्यांनी मुलीची शपथ घेऊन..."; खडसेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचं स्पष्टीकरण

Devendra Fadnavis On Eknath Khadse : देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुलीची शपथ घेऊन मला राज्यपाल करतो आश्वासन दिलं होतं, असा खळबळजनक गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला आहे.
Eknath Khadse, Devendra Fadnavis
Eknath Khadse, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 14 Sep : "देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुलीची शपथ घेऊन मला राज्यपालपदाचं आश्वासन दिलं होतं" असा खळबळजनक गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला आहे. खडसेंच्या याच दाव्यावर आता खु्द्द राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis ) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

नागपुरात (Nagpur) माध्यम प्रतिनिधींनी फडणवीसांना खडसेंच्या दाव्याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, "एकनाथ खडसेंचे विधान मी ऐकलेलं नाही. पण खडसेंच्या बाबतीत आमच्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतलेला आहे. तो आम्हाला सर्वांना मान्य आहे.

केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून, त्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल." असं फडणवीसांनी सांगितलं मात्र, यावेळी त्यांनी खडसेंनी (Eknath Khadse) केलेला दावा फेटाळला नाही. त्यामुळे त्यांनी खरंच खडसे यांना राज्यपालपदाचा शब्द दिला होता का? अशा चर्चांना उधाण आलं आहे.

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे लोकसभा निवडणुकीच्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडले होते. मात्र अनेक महिन्यांनंतरही त्यांचा अधिकृत भाजप प्रवेश झाला नाही. भाजपच्या (BJP) दिल्लीतील वरिष्ठ नेतृत्वाशी माझं बोलणं झालं असल्याचंही त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं.

Eknath Khadse, Devendra Fadnavis
Eknath Khadse Politics: खडसेंनी वाढवला सस्पेन्स, भाजपच्या केंद्रीय नेत्यांबाबत म्हणाले...

मात्र राज्यातील नेत्यांनी त्या संदर्भातील भूमिका स्पष्ट केली नसल्याचंही खडसेंनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. याचवेळी त्यांनी सध्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट केला होता.

एकनाथ खडसेंचा दावा नेमका काय?

मुलाखतीत बोलताना खडसे म्हणाले, "एके दिवस देवेंद्र फडणवीसांनी मला बोलावलं, मी त्यांच्याकडे गेलो. त्यावेळी, 'तुम्ही प्रसारमाध्यमं म्हणत आहात ज्याप्रमाणे पंकजा मुंडेंना त्यांनी न्याय दिला, त्याप्रमाणे मला न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केल्याचं ते मला म्हणाले.'

Eknath Khadse, Devendra Fadnavis
BJP And Congress : जेपी नड्डा मुंबईत, तर पटोले दिल्लीत; भाजप आणि काँग्रेसमध्ये 'जोर' बैठका

यावेळी फडणवीस म्हणाले, 'मी आता तुम्हाला राज्यपाल करणार आहे. तशी मी वरिष्ठांकडे शिफारस करणार आहे.' त्यावर मी त्यांना स्पष्ट बोललो की, 'देवेंद्रजी तुम्ही बऱ्याचदा अशी आश्वासनं देता, हे करेन, ते करेन, परंतु तुम्ही ती पूर्ण करत नाही. त्यामुळे मला खरं सांगा, कारण माझा विश्वास बसत नाही.'

त्यावर ते म्हणाले, 'आम्ही तुम्हाला राज्यपाल करणार आहोत. मी त्यांना म्हटलं, आनंदाची गोष्ट आहे, परंतु माझा यावर विश्वास नाही. त्यावर फडणवीस मला म्हणाले 'मी माझ्या एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन सांगतो आम्ही तुम्हाला राज्यपाल करणार आहोत.' हे देवेंद्र फडणवीसांचे शब्द जसेच्या तसे मी तुम्हाला जाहीरपणे सांगत आहे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com