BJP And Congress
BJP And CongressSarkarnama

BJP And Congress : जेपी नड्डा मुंबईत, तर पटोले दिल्लीत; भाजप आणि काँग्रेसमध्ये 'जोर' बैठका

A session of meetings between BJP and Congress in the wake of Assembly elections : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि काँग्रेसमध्ये राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थित बैठकांचे सत्र सुरू.
Published on

Mumbai News : विधानसभा निवडणूक, जशी जवळ येत आहे, तशी राज्यातील राजकीय घडमोडींना वेग येऊ लागला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बैठकांचा जोर वाढला आहे. भाजपमधील राष्ट्रीय नेते यांचे मुंबई दौरे वाढले असून, अमित शाह यांच्यानंतर आता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत.

यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीमधील जागा वाटपाचा 75 टक्के तिढा सुटला असल्याचं म्हटलं आहे. 'मविआ'मधील राज्यातील काँग्रेस नेते महत्त्वपूर्ण निर्णयासाठी दिल्लीत बैठकीला रवाना झाले आहेत.

महायुतीमधील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने (Shiv Sena) त्यांनी त्यांच्या काही जागा जाहीर केल्या आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाने 25 जागा जाहीर केल्यानंतर शिवसेने एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या जागा जाहीर केल्या आहे. महायुतीमधील सर्वात मोठा पक्ष भाजप मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास तयार नाही. यातच भाजपच्या केंद्रीय नेत्यांचे मुंबई दौरे वाढले आहेत. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी लालबागचा राजाचं दर्शन घेतल्यानंतर आता पक्षाध्यक्ष जेपी नड्डा मुंबईत येत आहेत. गणेशपर्व सुरू आहे. भाजपचे वरिष्ठ नेते दर्शनाला येतात. जेपी नड्डा त्यासाठी येत आहेत, तरी त्यांच्या उपस्थित महत्त्वपूर्ण बैठका होणार असल्याचे भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

BJP And Congress
Chandrashekhar Bawankule : अजित पवारांचे 25 उमेदवार निश्चित? भाजपची पहिली प्रतिक्रिया, 'जागा वाटप ...'

मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार : बावनकुळे

दरम्यान, भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अकोला इथं महायुतीमधील जागा वाटपावर मोठं भाष्य केलं आहे. महायुतीमधील 75 टक्के जागा वाटपाचा तिढा सुटल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर निवडून येणारा उमेदवार, हा निकष असणार असल्याचेही संकेत त्यांनी दिले. मराठा समाजाच्या आरक्षणाचा तिढा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील एकत्र बसून सोडवतील आणि 'ओबीसीं'च्या आरक्षणाला धक्का न लावता, मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल, असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं.

BJP And Congress
Martha Reservation News : ...अन्यथा जलसमाधी घेणार 'या' मराठा नेत्याचा इशारा

काँग्रेसची दिल्लीत बैठक

भाजपचे केंद्रीय नेते मुंबई दौऱ्यावर येत आहे, तर मविआमधील काँग्रेसच्या राज्यातील नेते दिल्लीकडे रवाना झाले आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दिल्लीत काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि राज्यातील प्रमुख नेते बैठकीला उपस्थित राहणार आहे. 'मविआ'मध्ये देखील 90 टक्के जागा वाटपावर शिक्कामोर्तब झाला आहे. राज्यातील निवडणुका महायुती सरकार लांबणीवर टाकेल, अशी भीती आणि राहुल गांधी यांच्या आरक्षणाच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढून भाजपने राज्यभर केलेल्या आंदोलन, या सर्वांच्या तोंडावर काँग्रेसची दिल्लीत आज होत असलेल्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com