Mahavikas Aghadi : ‘सोलापूर शहर मध्य’ला तौफिक शेख, तर ‘शहर उत्तर’मधून महेश कोठे इच्छूक; महाआघाडीत बिघाडी अटळ!

Assembly Election 2024 : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. जिल्ह्यातील इच्छुकांनी या वेळी उमेदवारीची मागणी केली. पुढील 8 ते 9 दिवस राज्यभर असा दौरा चालणार आहे, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
Taufiq Shaikh-Mahesh Kote-Jayant Patil
Taufiq Shaikh-Mahesh Kote-Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 19 July : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदे खासदार झाल्यानंतर विधानसभा इच्छुकांची संख्याही वाढली आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. सोलापूरच्या दौऱ्यावर आलेले प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मतदारसंघनिहाय इच्छुकांची यादीच वाचून दाखवली.

जयंत पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माढ्यातून अनेक कार्यकर्ते इच्छुक आहेत. माळशिरसमधून दोघांची लढण्याची इच्छा आहे.

सोलापूर शहर मध्य मतदारसंघात तौफिक शेख, सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून महेश कोठे (Mahesh Kote) इच्छुक आहेत. आम्ही फक्त चर्चा केली आहे. कोणालाही अर्ज भरायला सांगितलेला नाही.

सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. जिल्ह्यातील इच्छुकांनी या वेळी उमेदवारीची मागणी केली. पुढील 8 ते 9 दिवस राज्यभर असा दौरा चालणार आहे, असेही जयंत पाटील (Jayant Patil) यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, तौफिक शेख यांनी शहर मध्य मतदासंघातून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे विधानसभा उमेदवारीची मागणी केली आहे, त्यामुळे महाविकास आघाडीतील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि शरद पवार गटात शहर मध्य विधानसभा मतदासंघावरून रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांच्या उपस्थितीत 11 विधानसभा मतदारसंघाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात शरद पवार गटाचे नेते तौफिक शेख यांनी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्याची मागणी केली.

Taufiq Shaikh-Mahesh Kote-Jayant Patil
Assembly Election 2024 : महाविकास आघाडी विधानसभेला 170 पेक्षा जास्त जागा जिंकेल; जयंत पाटलांचे भाकित

ते म्हणाले, यापूर्वी मी एमआयएम मध्ये असताना ‘शहर मध्य’मधून निवडणूक लढवली आहे. त्या वेळी अत्यंत थोडक्या मतांनी माझा पराभव झाला होता. मात्र, यंदाच्या वर्षी मी शंभर टक्के विजयी होण्याचा आत्मविश्वास आहे, त्यामुळे शहर मध्य मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी मला देण्यात यावी.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी शरद पवारांची भेट घेत शहर मध्य विधानसभा माकपला सोडण्याची मागणी केली होती. त्यामुळे आता महाविकास आघाडीतील दोन पक्षांमध्ये सोलापूर शहर मध्य मतदार संघावरून रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.

Taufiq Shaikh-Mahesh Kote-Jayant Patil
Sharad Pawar Nashik Tour : शरद पवारांच्या दौऱ्यात ठरणार अजित पवारांच्या आमदाराची विकेट घेण्याची रणनीती

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com