Online Fraud : ऑनलाइन 'गेम'च झाला ! व्यापाऱ्याला ५८ कोटी रुपयांना गंडा घातला...

Nagpur Online App Fraud : नागपूरातील ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकरणाने राज्यात खळबळ
Online Gaming App Fraud
Online Gaming App FraudSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : नागपुरातील एका व्यापाऱ्याची 'ऑनलाइन गेमिंग अॅप'च्या 'सेटिंग'मध्ये गडबड करून तब्बल ५८ कोटी रुपयांनी फसवणूक करण्यात आल्याचे उघड झाले आहे. अॅप चालवणारा आरोपी अनंत उर्फ सोंटू नवरतन जैन हा गोंदियांतील असून तो दुबईला पळून गेल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्याच्या घरातून १० कोटीहून अधिक रक्कम जप्त केली आहे. या 'अॅप'च्या माध्यमातून अनेक लोकांची फसवणूक झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. यामुळे 'ऑनलाइन अॅप'च्या माध्यमातून 'गेम' खेळताना आयुष्याचा 'खेळ' होऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे. (Latest Marathi News)

Online Gaming App Fraud
PM Narendra Modi : मोदींच्या परदेश दौऱ्यांच्या खर्चाचा आकडा अडीचशे कोटींच्या पुढे

सोलापूरातील बार्शीत, पुणे येथे गुंतवणुकीच्या माध्यमातून लोकांची कोट्यवधींची फसवणूक केल्याचे प्रकरणे ताजी असतानाच नागपुरातील 'ऑनलाइन' फसवणुकीचे प्रकरण समोर आले आहे. सरकारच्या वतीने कसिनो, रमी, तीन पत्ती, क्रिकेट आदी 'ऑनलाईन गेमिंग अॅप'ला परवानगी दिलेली आहे. याच धर्तीवर काही 'फ्रॉड अॅप' तयार करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्याचे प्रकार सर्रासपणे घडत असल्याचेही समोर येत आहे. या 'अॅप'च्या माध्यमातून नागपूरातील व्यापाऱ्याला तब्बल ५८ कोटी रुपयांना लुटल्याचे समोर आले आहे.

नागपुरातील एक व्यापारी दीड वर्षांपूर्वी 'अॅप' चालविणाऱ्या आरोपीच्या संपर्कात आले होते. आरोपींनी 'गेमिंग अॅप'च्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कमाई होत असल्याचे त्यांना आमिष दाखवले. त्यातून व्यापाऱ्याने 'गेम' खेळण्यास सुरूवात केली. मात्र 'अॅपच्या सेटिंग'मध्ये गडबड केल्याने खेळताना ते सातत पैसे हरत गेले. हे 'डॉक्टर्ड' अॅप अशा पद्धतीने तयार केले होते की त्यात खेळणारा हरत जातो. अशा पद्धतीने व्यापारी ५८ कोटी रुपये हरल्याने आर्थिक अडचणीत आले. यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली.

Online Gaming App Fraud
Pankaja Munde News : दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा एकाच दिवशी वाढदिवस हा `युनिक` योग...

या प्रकरणी पोलिसांनी चौकशी केल्यावर गोंदियाच्या अनंत उर्फ सोंटू नवरतन जैन हा हे अॅप चालवत असल्याचे लक्षात आले. त्याच्या घरातून १० कोटीपेक्षा अधिक रक्कम जप्त केली असून जैन दुबईत पळून गेल्याचे उघडकीस आले आहे. या 'अॅप'ची 'लिंक' भारतासह इतर देशातही व्हायरल झाल्याची पोलिसांची माहिती आहे. तसेच 'अॅप'च्या माध्यमातून आणखी लोकांची फसवणूक झाल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com