Nagpur : अखेर अनेक नाट्यमय घडामोडीनंतर महाविकास आघाडीच्या नागपूर येथे 16 एप्रिल रोजी होणाऱ्या 'वज्रमूठ सभे'ला नागपूर शहर पोलिसांनी काही अटी शर्थींसह परवानगी दिली आहे. आघाडीसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. शहरातील दर्शन कॉलनीतील सद्भावनानगर मैदानावरील सभेचा वज्रमूठ सभेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सभेला अवघे तीन दिवस शिल्लक राहिलेले असताना पोलिसांची परवानगी न मिळाल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं.
छत्रपती संभाजीनगर येथील यशस्वी सभेनंतर महाविकास आघाडीच्या नागपूर येथील सभेला परवानगी मिळण्याबाबत पोलिसांकडे अर्ज केला होता. सभेला अवघे तीन दिवस शिल्लक राहिलेले असताना पोलिसांची परवानगी न मिळाल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. तसेच आघाडीच्या सभेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, अखेर पोलिसांनी देखील या सभेला परवानगी दिली आहे, मात्र याचवेळी सभेसाठी काही अटी आणि शर्ती देखील घालून दिल्या आहेत.
महाविकास आघाडीची संयुक्त वज्रमूठ सभेसाठी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनही पक्ष जोरदार तयारी करत आहेत. त्यादृष्टीने तीनही पक्षाच्या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी सभास्थळी भेट दिली आहे. या वज्रमूठ सभेला माजी मुख्यमंत्री व ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते यांची उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
पोलीस आयुक्त काय म्हणाले?
आयोजकांनी आम्हाला 10 हजार लोक या सभेसाठी येतील अशी माहिती दिली आहे. मैदानाची मालकी असलेल्या NITने त्यांना मैदानाच्या मालकीची परवानगी दिली आहे. त्या आधारावर पोलिसांनी महाविकास आघाडीच्या सभेसाठी पोलीस परवानगी दिली आहे अशी माहिती नागपूर पोलिसांनी दिली आहे.
सभेसाठी पोलिसांच्या अटी काय ?
कार्यक्रमादरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, इत्यादी बाळगू नये किंवा प्रदर्शन करु नये व शस्त्र अधिनियमातील तरतुदीचा भंग करू नये. कार्यक्रमाच्या वेळी कोणत्याही प्रकारे कोणताही रस्ता रहदारीस बंद करण्यात येऊ नये अथवा वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.
सभेसाठी आवश्यक असलेल्या शासकीय विभागाच्या परवानग्या घेण्यात याव्यात. सभेसाठी उभारण्यात आलेल्या स्टेजचे संबधित ठेकेदाराकडून तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून "स्टेज स्टॅबिलीटी " प्रमाणपत्र पोलिसात सादर करावे. सभेच्या ठिकाणी कमाल मर्यादेपेक्षा जास्त लोकांना निमंत्रित करु नये असं आवाहनही पोलिसांनी सभेच्या आयोजकांना केले आहे.
बावनकुळेंचा सभेआधीच आघाडीला इशारा....
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)यांनी आघाडीला सभेआधीच आघाडीला इशारा दिला आहे. बावनकुळे म्हणाले, आघाडीच्या सभेला आमचा बिलकूल विरोध नाही. त्यांनी जरुर सभा घ्यावी. विरोधकांनी सरकारच्या धोरणांवर, पक्षीय धोरणावर बोलावं. विरोधकांनी यावर आधारित काही मुद्दे मांडले तर सरकारला सुधारणा करता येतात. चार गोष्टींमध्ये बदल करता येतो.
परंतु, त्यांनी व्यक्तिगत टीका केली तर ती चालणार नाही. या सभेत तसं काही ते बोलले, आमच्या नेत्याचा अपमान केला तर तो अपमान मी मागे सांगितल्याप्रमाणे आम्ही सहन करणार नाही असल्याचं बावनकुळेंनी स्पष्ट केलं आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.