'हिंदुस्थानी भाऊ' पुन्हा अडचणीत ; नागपूर पोलिसांकडून नोटीस

काही दिवसापूर्वी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि आंदोलन सुरू केले होते. या विद्यार्थ्यांना भडकवल्याचा आरोप हिंदुस्थानी भाऊ वर आहे. याप्रकरणी त्याला १ फेब्रुवारीला अटक केली होती.
Nagpur Police Issues Notice to Hindustani Bhau
Nagpur Police Issues Notice to Hindustani Bhausarkarnama

नागपूर : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी भडकवल्याप्रकरणी हिंदुस्थानी भाऊ (Hindustani Bhau)उर्फ विकास पाठक याला गुरुवारी जामीन मंजूर करण्यात आला आहे. जामीन मिळताच नागपूर पोलिसांनी त्याला नोटीस बजावली आहे. ता. २२ फेब्रुवारी रोजी पोलिस ठाण्यात हजर राहण्याचा आदेश नागपूर पोलिसांनी दिला आहे.

राज्यात १० वी आणि १२ वीच्या परीक्षा ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन घेण्यात यावी, या मागणीसाठी काही दिवसापूर्वी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि आंदोलन सुरू केले होते. या विद्यार्थ्यांना भडकवल्याचा आरोप हिंदुस्थानी भाऊ वर आहे. याप्रकरणी त्याला १ फेब्रुवारीला अटक केली होती. १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला. (Nagpur Police Issues Notice to Hindustani Bhau)

काल (गुरुवारी) सेशन्स कोर्टाकडून त्याला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. ३० हजार रुपयांची वैयक्तिक हमी आणि तितक्याच रकमेसह एक किंवा दोन हमीदार देण्याच्या अटीवर सेशन्स कोर्टाने भाऊला जामीन मंजूर केला आहे. , हा जामीन मिळताच आता नागपूर पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे.

मुंबईसह नागपूर, औरंगाबाद, उस्मानाबाद, पुणे याठिकाणी बोर्डाची ऑफलाईन परीक्षा रद्द करावी यासाठी ३१ जानेवारी रोजी 'हिंदुस्थानी भाऊ' मुळे मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होते. दहावी-बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत अफवा पसरवणाऱ्या हिंदुस्तानी भाऊला धारावी पोलिसांनी १ फेब्रुवारीला अटक केली होती.

Nagpur Police Issues Notice to Hindustani Bhau
मोहित कंबोजांचे राऊतांना खुलं आव्हान ; आ देखे जरा किसमें कितना हैं दम

मुंबईत धारावीत शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले तर नागपूरमध्ये बसची तोडफोड केल्याचंही समोर आलं. 'हिंदुस्थानी भाऊ'च्या आवाहनानंतर ऑफलाईन परीक्षा रद्द करण्यासाठी आम्ही आंदोलनात उतरलो, असं मुंबईत जमलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले होते.

धारावीतील हिंसक आंदोलन प्रकरणी त्याला अटक करण्यात आली. बांद्रा महानगर दंडाधिकारी कोर्टाने हिंदुस्तान भाऊचा जामीन अर्ज फेटाळला होता. मुंबईत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad)यांच्या घराबाहेर मोठ्या संख्येत विद्यार्थी एकवटले आणि आंदोलन सुरू केले होते. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे एकच खळबळ उडाली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com