मोहित कंबोजांचे राऊतांना खुलं आव्हान ; आ देखे जरा किसमें कितना हैं दम

मोहित कंबोज यांनी भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar)यांच्यासोबत फोटो शेअर करीत टि्वट केले आहे. यामाध्यमातून त्यांनी राऊतांना खुले आव्हान केले आहे.
Sanjay Raut,Mohit Kamboj,Ashish Shelar
Sanjay Raut,Mohit Kamboj,Ashish Shelarsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : भष्ट्राचाऱ्यांचा आरोप करत शिवसेनेचे खासदास संजय राऊत (Sanjay Raut)आणि भाजपचे नेते एकमेंकासमोर उभे ठाकले आहे. राऊत, भाजपचे नेते किरीट सोमय्या, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदा घेत आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत.

संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत भाजपवर हल्लाबोल केला. 'सरकार पाडण्यासाठी सरकार तपास यंत्रणाचा गैरवापर भाजपचे नेते करीत असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. त्यांनी भाजपचे माजी पदाधिकारी मोहित कंबोज (Mohit Kamboj)यांच्यावरही आरोप केले आहेत. केंद्रीय यंत्रणांना राऊतांनी लक्ष्य केल आहे.

मोहित कंबोज यांच्यावर आरोप करीत आपण त्यांना ओळखत नसल्याचे राऊतांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यानंतर मोहित कंबोज यांनी राऊतासोबतचा फोटो शेअर करीत राऊतांनी आपल्याकडून २५ लाखांची मदत घेतल्याचा दावा केला आहे. आज पुन्हा एकदा मोहित कंबोज यांनी भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar)यांच्यासोबत फोटो शेअर करीत टि्वट केले आहे. यामाध्यमातून त्यांनी राऊतांना खुले आव्हान केले आहे.

''लड़ाई ऐसी लड़ेंगे की विरोधी भी याद रखेंगे ! आ देखे ज़रा किसमें कितना हैं दम ! जय भवानी जय शिवाजी ! हर हर महादेव,'' असे टि्वट कंबोज यांनी केलं आहे. आता राऊत यावर काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Sanjay Raut,Mohit Kamboj,Ashish Shelar
विद्यार्थ्यांना भडकवणाऱ्या 'हिंदुस्थानी भाऊ'ला जामीन मंजूर

''आपण कोणत्याही चौकशीसाठी तयार असल्याचंही कंबोज यांनी यापूर्वी सांगितले आहे. तसंच कोणतेही तथ्य नसताना आरोप केल्याने संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीची कायदेशीर नोटीस पाठवणार आहे,'' असे कंबोज यांनी दोन दिवसापूर्वी सांगितलं.

पत्रा चाळ जमिनीत मोहित कंबोज यांची गुंतवणूक असल्याचा आरोप संजय राऊत यांनी मंगळवारी (15 फेब्रुवारी) पत्रकार परिषदेत केला.कंबोज हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे 'फ्रंटमॅन' आहेत आणि तेच त्यांना एक दिवस बुडवणार असंही राऊत म्हणाले.

पत्रा चाळ येथील जमीन माझ्या कंपनीने कायदेशीररित्या खरेदी केली होती आणि त्यात आमचं आर्थिक नुकसानही झालं असं कंबोज यांनी स्पष्ट केलं. आपले आणि संजय राऊत यांचे पूर्वीपासून संबंध असल्याचंही कंबोज म्हणाले. दरवर्षी गणेशोत्सवात संजय राऊत घरी येतात तसंच अनेकदा राऊतांना आर्थिक मदत केल्याचा दावाही कंबोज यांनी केला आहे.

''गीतकार सलीम-जावेद अशी एक जोडी आहे. तशीच राजकारणात मलिक-राऊत अशा नवी जोडी तयार झाली आहे. ही जोडी दररोज नवीन आरोप करत आहे. राऊत यांनी मला फडणवीस यांचा 'ब्लू आय बॉय' म्हटलं हा माझा गौरव आहे. मात्र, संजय राऊत नक्की ठाकरेंचे आहेत की पवारांचे याचा त्यांनी खुलासा करावा,'' असा टोलाही कंबोज यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com