Nagpur Politics: भाजपचा काँग्रेस-शरद पवारांना दे धक्का! 12 नगरसेवक गळाला

12 Corporators join BJP :कुही नगरपंचायतीतील काँग्रेस आणि शरद पवार गटाचे विद्यमान नगरसेवक भाजपात प्रवेश केला आहे. भाजप प्रदेश उपाध्यक्ष राजू पारवे यांच्या नेतृत्वाखाली नागपूर ग्रामीण काँग्रेसचा पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश केला.
BJP
BJP Sarkarnama
Published on
Updated on

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी नागपूर जिल्ह्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. 12 नगरसेवकांचा भाजपात प्रवेश केला आहे. काँग्रेसच्या 9 विद्यमान नगरसेवकांसह महाविकास आघाडीच्या 12 नगरसेवकांचा यात सहभाग आहे. कुही नगरपंचायतीतील काँग्रेस आणि शरद पवार गटाचे विद्यमान नगरसेवक भाजपात प्रवेश केला आहे.

भाजप प्रदेश उपाध्यक्ष राजू पारवे यांच्या नेतृत्वाखाली नागपूर ग्रामीण काँग्रेसचा पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागपुरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा झाला.

BJP
Beed Kalamb Woman Death Case: कळंब मधील महिलेचा खून; एका जण ताब्यात; संतोष देशमुख हत्येशी संबंध?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूरच्या दौरा नुकताच झाला. त्यानंतर नागपूर भाजप कार्यकर्ते- पदाधिकाऱ्यामध्ये नवचैतन्य संचारले आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या पूर्वीच नागपुरातील वातावरण ढळवून निघाले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर मोदींचा हा पहिला नागपूर दौरा होता. या दौऱ्यामुळे नागपूर शहर हे भाजपमय झालेलं बघायला मिळालं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूरच्या दौरा नुकताच झाला. त्यानंतर नागपूर भाजप कार्यकर्ते- पदाधिकाऱ्यामध्ये नवचैतन्य संचारले आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या पूर्वीच नागपुरातील वातावरण ढळवून निघाले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर मोदींचा हा पहिला नागपूर दौरा होता. या दौऱ्यामुळे नागपूर शहर हे भाजपमय झालेलं बघायला मिळालं.

दोन दिवसापूर्वी नागपूर जिल्ह्यातील काँग्रेस आणि घटकपक्षातील २२ सरपंच आणि शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर काँग्रेसमधील गळती थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसते. रामटेक आणि देवलापार या ग्रामीण भागातील काँग्रेस आणि काँग्रेस घटक पक्षातील पक्षातील २२ सरपंच आणि शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. या पक्ष प्रवेशामुळे काँग्रेस सह इतर महाविकास आघाडीतील पक्षांना मोठे खिंडार पडले आहे.

यावेळी आमदार समीर मेघे, आमदार आशीष देशमुख, आमदार चरणसिंग ठाकूर,माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, माजी आमदार सुधीर पारवे, ग्रामीण अध्यक्ष सुधाकरराव देशमुख, माजी आमदार टेकचंद सावरकर, माजी आमदार राजू पारवे, डॉ. राजीव पोद्दार,अनिल निधान आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com