
Beed News: धाराशिवच्या कळंब येथील एका महिलेच्या हत्येप्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. दोन आरोपींवर पोलिसांना संशय आहे. यातील एका आरोपीला धाराशिव पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. दुसरा आरोपी फरार आहे.
पहाटे पाच वाजता कळंब पोलिसांकडे हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी हा हत्या केल्यानंतर मृतदेहासोबत दोन दिवस झोपला होता, अशी धक्कादायक माहिती त्याने पोलिसांनी दिली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि महिलेला खून या प्रकरणाशी काही संबध आहे का, याबाबतचा तपास पोलीस करीत आहेत. कळंब येथील मनीषा कारभारी बिडवे यांची हत्या झाल्याचा प्रकार चार दिवसापूर्वी उघडकीस आला होता. ही महिला एकटीच राहत होती. याबाबतचे वृत्त साम टिव्हीने दिले आहे.
कळंब पोलिसात दोन व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी उस्मान सय्यद याला कळंब पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा ताब्यात घेतलं आहे. रामेश्वर भोसले हा फरार आहे, हे दोन्ही आरोपी बीड जिल्ह्यातील केज शहरातील आहेत. सरपंच संतोष देशमुख यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी या महिलेचा वापर केला गेला असल्याचा आरोप झाला आहे.
28 मार्च रोजी कळंब शहरातील एका नामवंत कॉलनीमध्ये मनीषा बिडवे हिचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. पोलिसांनी याप्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती. तपासात आता या महिलेचा खून झाल्या उघड झाले आहे. पोलिसांनी दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. संतोष देशमुख प्रकरणात या महिलेचा संबंध होता का हे आता तपासात उघड होण्याची शक्यता आहे.
ही महिला संतोष देशमुख यांना छेडछाडीच्या प्रकरणात अडकवण्याच्या प्लॅनमध्ये सहभागी असल्याचा तिच्यावर आरोप होता. तिच्या हत्येबाबत विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहे. 'ती महिला कोण आहे? ते समोर येणं खूप गरजेचं आहे', असे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.