
Nagpur News : लोकसभेला विदर्भात सपाटून मार खाल्ल्यानंतर महायुतीनं विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करत महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला. त्यात भाजप (BJP) उमेदवार कृष्णा खोपडे यांनी पूर्व नागपूरमधून विजय खेचून आणला. त्यांचा मुंबईत खास सत्कार करण्यात आला. या सत्कारामागचं कारणही तेवढंच मोठे आहे.
आमदार कृष्णा खोपडे यांचे नाव नागपूरकरांना परिचित आहे. मात्र, आज त्यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विशेष उपस्थित मुंबईत येथे खास सत्कार करण्यात आला. याचे कारणही तेवढेच मोठे आहे. भाजप उमेदवार कृष्णा खोपडे हे पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातून (Assembly Election) विक्रमी मतांनी निवडून आले आहेत. एवढेच नव्हे तर विदर्भात सर्वाधिक मताधिक्यांनी निवडून येण्याचा मान त्यांनी पटकावला आहे.
खोपडे यांनी तब्बल 1 लाख 15 हजार 223 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी यावेळी विजयी चौकार मारला. त्यांचे विरोधक महाविकास आघाडीचे उमेदवार दुनेश्वर पेठे यांना 50 हजार मतांचाही आकडा गाठता आला नाही. त्यांना आव्हान देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकार तसेच महिला आयोगाच्या सदस्य आभा पांडे यांनासुद्धा 10 हजार मतांपर्यंत मजल मारता आली नाही.
कृष्णा खोपडे अतिशय सामान्य माणूस म्हणूण परिचित आहेत. महापालिकेच्या निवडणुकीपासून त्यांची कारकीर्द सुरू झाली. ते उपमहापौर आणि नागपूर महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते. एकेकाळी पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता.
काँग्रेसचे हेविवेट नेते आणि माजी मंत्री सतीश चतुर्वेदी या मतदारसंघाचे नेते होते. ते चारवेळा या मतदारसंघातून निवडून आले होते. भल्यभल्यांना त्यांना पराभूत करणे जमले नव्हते. मात्र कृष्णा खोपडे यांनी पहिल्याच प्रयत्नात चतुर्वेदी यांना पराभूत केले. त्यानंतर चतुर्वेदी यांनी पुन्हा पूर्व नागपूरमधून निवडणूक लढण्याची हिंमत केली नाही. खोपडे यांनी आता पूर्व नागपूरला भाजपचा अभेद्य बालेकिल्ला केला आहे.
विदर्भातून सर्वाधिक विक्रमी मतांनी निवडून आल्याबद्धल मंगळवारी (ता.26) कृष्णा खोपडे यांना खास मुंबईत बोलावून सत्कार करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यसम्राट असे संबोधून त्यांना सन्मान केला. महायुतीच्या निवडून आलेल्या अनेक आमदारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेतली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.