Nagpur : नागपूर अधिवेशन : सभापती, अध्यक्ष १५ नोव्हेंबरला नागपुरात...

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter Session) १९ डिसेंबरपासून नागपुरात (Nagpur) होत आहे. कोरोनामुळे (Corona) सलग दोन वर्ष नागपुरात अधिवेशनच झाले नाही.
Nagpur Assembly Building
Nagpur Assembly BuildingSarkarnama

नागपूर : विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) १५ नोव्हेंबरला हिवाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी नागपुरात येणार आहे.

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter Session) १९ डिसेंबरपासून नागपुरात (Nagpur) होत आहे. कोरोनामुळे (Corona) सलग दोन वर्ष नागपुरात अधिवेशनच झाले नाही. यावर्षी सध्या तरी दोन आठवड्यांचे अधिवेशन होणार असले तरी ते कामकाज तीन आठवडे चालविण्यासाठी सत्ताधारी आग्रही आहेत. तशा सूचना सरकारतर्फे अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. अधिवेशनासाठी रविभवन, नागभवन, आमदार निवास इतर शासकीय इमारतींची देखभाल दुरुस्तीसोबत रंगरंगोटी करण्यात येणार आहे. यावर्षी अधिवेशनावर होणाऱ्या खर्चात वाढ अपेक्षित असून प्रशासनाने ९५ कोटींच्या खर्चाचा आराखडा तयार केला आहे.

यासाठी निविदाही प्रसिद्ध करण्यात आल्या असून लवकरच कार्यादेश देण्यात येणार असल्याचे समजते. नवीन शिंदे-फडणवीस सरकारचे खऱ्या अर्थाने हे पहिलेच अधिवेशन असणार आहे. त्यामुळे सरकारकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. अधिवेशनाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसेच विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवतसह इतर अधिकारी १५ नोव्हेंबरला येणार आहे.

यावेळी विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, महानगर पालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकरसह बांधकाम, वीज व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

Nagpur Assembly Building
Nagpur : हिवाळी अधिवेशन : सोमवारपासून होणार कामांना सुरुवात, ९५ कोटींचा खर्च !

अधिवेशन तीन आठवडे चालणार ?

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २ आठवडे घेण्याचे निश्‍चित झाले असली तरी अधिवेशनाचा कालावधी १ आठवडा वाढवण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे. मागील काळात झालेल्या एका बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशा सूचना दिल्याची माहिती आहे. सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न यशस्वी झाल्यास हे अधिवेशन तीन आठवडे चालण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com