Nagpur University News : कुलगुरूंवर निलंबनाची तलवार, ओबीसी विरुद्ध सवर्ण रंग देऊन प्रकरण दडपण्याचे प्रयत्न !

BJP : भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा या मंचमध्ये समावेश आहे.
Nagpur University
Nagpur UniversitySarkarnama
Published on
Updated on

BJP MLA is in trouble : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्यावरून आता बहुजन विरुद्ध अभिजन असा नवा वाद निर्माण केला जात आहे. प्रत्येक जण सोयीने याचा वापर करीत असल्याने भाजपचेच आमदार अडचणीत आले आहे. (Many office bearers of BJP are included in this forum)

कुलगुरूंच्या बचावासाठी विद्यापीठ शिक्षण मंचने पुढाकार घेतला आहे. हा मंच संघ पुरस्कृत आहे. भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा या मंचमध्ये समावेश आहे. मंचच्या नेत्या माजी महापौर कल्पना पांडे आहेत. एमकेसीएल कंपनीच्या अनियमिततेची चौकशी सुरू असल्याने निकालासंदर्भात कुठलेही काम देऊ नये असे आदेश उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी दिले होते.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांच्या आदेशानंतरही कुलगुरूंनी दुर्लक्ष केले आणि त्याच कंपनीला काम दिले. हा विषय भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. त्यावर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी कुलगुरूंवर कारवाई करावी याकरिता राज्यपालांकडे संपूर्ण माहिती सादर करण्यात आल्याचे सांगितले.

सोबतच यासंदर्भात लवकरच चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेशही नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात दिले. त्यानुसार कुलगुरूंवर निलंबनाची तलवार लटकलेली असताना शिक्षण मंचने कुलगुरूच्या समर्थनार्थ मोर्चा उघडला आहे. विविध प्राधिकरणातील त्यांचे सदस्य राज्यपाल, मुख्यमंत्री, (Chief Minister) उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कुलगुरूंवरचे आरोप खोटे असल्याचे पटवून दिल्या जात आहे.

Nagpur University
Nagpur BJP News : कार्यालये बंद करून आराम करणाऱ्या माजी नगरसेवकांना भाजपने फटकारले, दिला ‘हा’ इशारा !

या संदर्भात मंचची विद्यापीठात बैठक झाली. त्यात करण्यात आलेल्या तक्रारीत भाजपचे आमदार आणि भाजपशी संबंधित काही पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे कळते. आता या मुद्याला ओबीसी (OBC) विरुद्ध सवर्ण असा रंग देऊन हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न केला जात असल्याचे समजते.

भाजपच्या (BJP) एका पदाधिकाऱ्यासोबत संपर्क साधला असता कुलगुरू यांच्याशी कुठलाही वैयक्तिक वाद नसल्याचे सांगितले. एमकेसीएलचे काम बंद करण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले होते. त्यानंतरही याच कंपनीला काम देण्यात आले. या प्रकरणाची बाविस्कर समितीने चौकशी केली. तसा अहवाल सादर केला आहे. शिक्षण मंचला हे कुलगुरूंविरुद्ध षड्यंत्र वाटत असेल तर चौकशी समितीचा अहवाल खोटा असल्याचे सिद्ध करावे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com