Nagpur violence : दंगलीत फक्त मुस्लिम समाज टार्गेट..., नागपूरमध्येच काँग्रेस नेत्याचे फडणवीसांवर गंभीर आरोप

Ramesh Chennithala On BJP : "नागपूरमध्ये घडलेल्या हिंसाचारास फक्त एकाच धर्माच्या लोकांना टार्गेट केले जात आहे. फक्त मुस्लिम व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फहीन खानला मुख्य आरोपी करून त्यांच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे."
Devendra Fadnavis, Nagpur violence
Devendra Fadnavis, Nagpur violenceSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 16 Apr : औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूरमध्ये दंगल उसळली होती. याला कोण कारणीभूत आहे हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र, देशात आणि राज्यात सांप्रदायिक विचारांचे सरकार आहे. त्यामुळे कारवाईसुद्धा एकतर्फीच झाली.

विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निष्पक्ष सरकार चालवत नसल्याचा थेट आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथाला यांनी केला. काँग्रेसच्या सद्‍भवाना यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

नागपूरमध्ये (Nagpur) घडलेल्या हिंसाचारास फक्त एकाच धर्माच्या लोकांना टार्गेट केले जात आहे. फक्त मुस्लिम व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फहीन खानला मुख्य आरोपी करून त्यांच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या घरावरही महापालिकेच्यावतीने बुलडोजर चालवून जमीनदोस्त करण्यात आलं आहे.

Devendra Fadnavis, Nagpur violence
Gopichand Padalkar : तुमचं लग्नही ब्राह्मणांनी लावलं, मग तुम्ही बायको सोडणार का? गोपीचंद पडळकर भडकले...

कोर्टाने महापालिकेची कारवाई बेकायदेशीर ठरवली आहे. संपूर्ण कारवाईस स्थगिती दिली आहे. या सर्व घटनाक्रमाचा उल्लेख करून रमेश चेन्निथाला यांनी आंदोलन करणाऱ्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या विरुद्ध कारवाई का केली नाही? असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला.

सरकार कोणत्याही पक्षाचे असो. सर्व जाती धर्माचा मान सन्मान राखणे, त्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असते. मात्र, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपली जबाबदारी निष्पक्षपणे पार पाडताना दिसत नाहीत. देशातील आणि राज्यातील जातीवादी सरकारला आपली सत्ता कायम ठेवायची आहे.

Devendra Fadnavis, Nagpur violence
Ajit Pawar : अजितदादांचा सल्ला पक्षातीलच नेते मंडळींना मानवणार का? 'त्या' आदेशावर कधी होणार कारवाई?

याकरिता जातीधर्मात विष कालवले जात आहे. फूट पाडली जात असल्याचा आरोपही चेन्निथाला यांनी केला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याही विरोधात चार्जशिट दाखल करण्यात आली आहे. भाजपच्या विरोधात बोलणाऱ्यांवर दबाव टाकला जात आहे. याकरिता ईडी आणि सीबीआयचा वापर केला जात आहे. यापूर्वीसुद्धा राहूल गांधी आणि सोनिया गांधी यांनी सीबीआयने चौकशी केली होती.

त्यात त्यांना काहीच आढळले नाही. त्यामुळे मानसिक त्रास देण्यासाठी चार्जशिट दाखल करण्यात आली आहे. काँग्रेसला संपवण्याचे षडयंत्र रचल्या जात आहे. मात्र काँग्रेस संपणार नाही. काँग्रेसचे कार्यकर्ते विरोधात संघर्ष करतील. आम्ही सर्व एकजूट होऊन भाजपचा दबावाला भीक घालणार नसल्याचे चेन्निथाला म्हणाले.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com