Gopichand Padalkar : तुमचं लग्नही ब्राह्मणांनी लावलं, मग तुम्ही बायको सोडणार का? गोपीचंद पडळकर भडकले...

BJP MLA Gopichand Padalkar’s Statement on Sambhaji Brigade : काही इतिहासकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मोडतोड करून लिहिला, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.
Gopichand Padalkar
Gopichand PadalkarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : राज्यामध्ये काही संघटना जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसंच राज्यातील ब्राह्मण समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. पडळकर यांनी थेट संभाजी ब्रिगेडवर निशाणा साधत आपल्या नेत्याला वाचवण्यासाठी संभाजी ब्रिगेड असा जातीयवाद पेटवत असल्याचा आरोप देखील पडळकर यांनी केला.

पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, काही इतिहासकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मोडतोड करून लिहिला. मात्र त्यामध्ये बहिरजी नाईक, जीवा महाल, शिवा काशिद यांच्याबाबत एक पान देखील लिहिलं गेलं नाही. बाजीप्रभू देशपांडे यांचा इतिहास देखील चुकीचा आहे, हे बोलायला कमी करत नाहीत.

Gopichand Padalkar
Ranjit Kasle News : चक्र फिरली; पकडून दाखविण्याचे चॅलेंज देणारा कासले पोलिसांना शरण येणार, गुपित उलगडणार...

बाजीप्रभू देशपांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज गडावर पोहोचेपर्यंत प्राण सोडला नाही. मात्र, काही लोक मतांसाठी ब्राह्मण समाजाला बदनाम करण्यासाठी कोणत्या थराला जात आहेत. हे महाराष्ट्रातील बहुजन समाज खपवू घेणार नाही. संभाजी ब्रिगेड मधील लोकांना माझा सवाल आहे की, तुमच्या आई-बापाचं लग्न ब्राह्मणांनी लावलं, मग त्यांनी बायको सोडायची का? तुमचं लग्न देखील ब्राह्मणांनी लावलं मग तुम्ही बायको सोडणार आहात का? तुमच्या घरभरणीची वास्तुशांती ब्राह्मणांनी केली मग तुम्ही घर पाडणार का?, असा सवाल पडळकर यांनी केला.

सगळ्याच समाजामध्ये चांगले वाईट लोक असतात. मराठा समाजात देखील काही लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात होते. त्या पद्धतीची प्रवृत्ती त्या समाजात देखील होती. परंतु इतर मराठा समाजातील लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत ताकतीने लढत होते. म्हणून ती संपूर्ण जात चुकीची नसते. एखादा ब्राह्मण चुकीचा असू शकतो म्हणून सगळ्यांना शिव्या देण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असा सवाल पडळकर यांनी उपस्थित केला.

Gopichand Padalkar
Nilesh Rane : 'वैभव नाईक तुम्हाला शुभेच्छा; पण, पुढचे 25 वर्ष आम्हीच आमदार-खासदार' : राणेंचा बिडवलकर हत्या प्रकरणावर पलटवार

ब्राह्मण आणि ब्राह्मणेत्तर वाद पेटवून राजकारणात पोळी भाजण्याचा प्रकार सुरू आहे. हा धंदा महाराष्ट्रातील बहुजनांच्या मुलांनी ओळखलेला आहे. तसेच भविष्यात देखील बहुजन समाजाच्या मुलांनी अशा राजकारणापासून सावध राहण्याची गरज असल्याचे पडळकर म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com