Nagpur violence : 'त्या' मंत्र्याच्या वक्तव्यामुळे नागपुरात दंगल उसळली; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा गंभीर आरोप

Curfew in Nagpur : नागपूर सारख्या शांत शहरात जाळपोळ, दगडफेक होणं ही दुर्दैवी घटना आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्याचे हे शहर असल्याने याचे गांभीर्य जास्त आहे. मात्र, या सर्व घटनेला एक मंत्री जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसच्या बड्या नेत्याने केला आहे.
Nagpur violence
Nagpur violenceSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 18 Mar : नागपूर (Nagpur violence) सारख्या शांत शहरात जाळपोळ, दगडफेक होणं ही दुर्दैवी घटना आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्याचे हे शहर असल्याने याचे गांभीर्य जास्त आहे. मात्र, या सर्व घटनेला एक मंत्री जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे विधिमंडळाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

महायुती (Mahayuti) सरकारने आपल्या एका मंत्र्याला आवरले असते तर ही घटना घडली नसती, असही वडेट्टीवार म्हणाले. त्यांनी यासाठी कोणाचे नाव घेतले नसले तरी नितेश राणे यांना यासाठी त्यांनी जबादार धरले. गेले काही दिवस मंत्रिमंडळात एक मंत्री सतत वळवळ करत आहे. त्याच्या वक्तव्यामुळे दोन समाजात वाद निर्माण झाला आहे. या मंत्र्याला वेळीच आवरले असते तर ही वेळ आली असती.

Nagpur violence
Nagpur Violence: नागपूर का पेटलं? स्थानिक भाजप आमदाराचा मोठा दावा; प्रत्यक्षदर्शींनी काय अनुभवलं

मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यात ही घटना घडली हे दुर्दैव आहे. यासाठी जे कोणी जबाबदार आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली. दरम्यान, महाल परिसरात सोमवारी उसळलेल्या दंगलीमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शहरातील मुस्लिम बहुल परिसरात मोठा बंदोबस्त लावण्यात आला असून या भागात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

त्यानुसार परिमंडळ ३ आणि परिमंडळ ४ मधील तीन पोलिस ठाण्यांतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. औरंजेबाच्या कबरीच्या वादातून एक गटाने केलेल्या निषेध आंदोलनानंतर सोमवारी दुपारपासून महाल परिसरात तणावाचे वातावरण होते. सायंकाळी सात वाजतनंतर एक समुदायातील काही युवकांनी भालदार पुरापासून निघून महाल परिसरात वाहनांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक सुरू केली.

Nagpur violence
Nagpur Violence : नागपुरात संचारबंदी लागू आता रस्तेही बंद? पोलिसांनी केली अधिसूचना जारी!

यावेळी पोलिसांच्या आणि राज्य राखीव दलाच्या जवानांनी त्यांना पांगवण्यासाठी लाठीमार आणि अश्रूधूर सोडण्यास सुरुवात केली. मात्र, मोठ्या प्रमाणात युवक शस्त्रासह रस्त्यावर उतरल्याने पोलिसांना त्यांना पांगवण्यासाठी बराच वेळ लागला. रात्री उशिरापर्यंत परिस्थिती नियंत्रणात आल्यावर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन सुरू करीत आरोपीची धरपकड सुरू केली.

ज्या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्या भागात पोलिसांकडून बाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. औरंजेबाची कबर तोडण्यासाठी एक गटाकडून केलेल्या आंदोलनात चादर जाळल्याच्या वादातून दुसऱ्या समुदायाने गणेशपेठ पोलिस ठाण्याला घेराव करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी एका युवकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com