Nana Patole : राष्ट्रप्रेमाची नौटंकी कशाला... प्रफुल पटेलांचं काय ? नाना पटोलेंचा रोखठोक सवाल

Praful Patel : शरद पवारांनंतर पटोलेंच्या निशाण्याने अजित पवार गटाची अडचण
Nana Patole, Praful Patel
Nana Patole, Praful PatelSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Winter Session 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री नवाब मलिक अधिवेशनात सहभागी होताच सत्ताधारी पक्षांच्या बाकावर जाऊन बसले. यावरून विरोधकांनी भाजपला खडे सवाल करत चांगलेच धारेवर धरले. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी, अजित पवारांना पत्र लिहून उठलेले वादळ शमवण्याचा प्रयत्न केला.

या वेळी 'सत्ता येते जाते, देश महत्त्वाचा,' याची आठवण करून देण्यासही ते विसरले नाहीत. मात्र, फडणवीसांचे पत्रच आता भाजपवर बुमरँग होताना दिसत आहे. यावर विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित करत भाजपची कोंडी करण्यास सुरुवात केली.

अजित पवारांना दिलेल्या पत्रात फडणवीसांनी देशप्रेमावर भाष्य करत अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोप झालेल्या मलिकांना महायुतीत घेता येणार नसल्याचे स्पष्ट केले. हाच धागा पकडून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेलांचे नाव घेत भाजपचा चांगलाच समाचार घेतला आहे. तसेच भाजपने राष्ट्रप्रेमाची भाषा करू नये, असेही पटोलेंनी ठणकावले आहे.

Nana Patole, Praful Patel
Nawab Malik Case : मलिक आणि मुश्रीफ यांच्यावरील आरोपांमध्ये काय आहे तफावत ? दानवेंनी सगळंच काढलं

नाना पटोले म्हणाले, 'दाऊदचा मित्र इक्बाल मिर्ची आहे. मिर्चीच्या माध्यमातून जे झालेले आहे... इडीने त्या ठिकाणी जे पाहिले आहे आणि प्रफुल पटेल यांची प्रॉपर्टी जप्त केली आहे. ही सर्व लिंक आहे ना, मग एकटे नवाब मलिकच का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. जर खरंच यांना राष्ट्र पहिले हे सांगायचे असेल किंवा ते जे वारंवार हे वाक्य बोलतात... तर माझा प्रश्न हा एवढाच आहे, की हे सर्व बाहेर करा ना.. मग तुमचं खरं प्रेम कळेल राष्ट्राबद्दलचं.. आम्ही किती राष्ट्रप्रेमी आहोत, याची नौटंकी करायचा प्रयत्न आहे,' असे म्हणत पटोलेंनी भाजपवर निशाणा साधला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनीही सील केलेल्या इमारतीवरून प्रफुल पटेलांवर टीका केली होती. पवारांनी लिहिलेल्या पुस्तकाला मी पुस्तकातून उत्तर देईन, असे पटेल म्हणाले होते. यावर बोलताना पवार म्हणाले, 'मी त्यांच्या पुस्तकाची आतुरतेने वाट पाहत आहे. त्यात त्यांनी मुंबईतील त्यांची इमारत सील का करण्यात आली आहे, याबाबतची माहिती वाचून आमच्या ज्ञानात भर पडेल,' असा टोला लगावला होता. पवारांनंतर पटोलेंनीही प्रफुल पटेलांवर केलेल्या विधानामुळे भाजपची कोंडी होण्याची शक्यता आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Nana Patole, Praful Patel
Nawab Malik letter News : 'मलिकांचं 'ते' पत्र फडणवीस-अजित पवारांनी ठरवून लिहिलंय'; माजी मंत्र्यांचा खळबळजनक आरोप!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com