Nagpur Winter Session : विधिमंडळ अधिवेशनावर शंभरावर मोर्चे, सव्वाशेच्या आसपास धरणं अन् 25 उपोषणांची धडक!

Marches, Dharna and Agitations: राष्ट्रवादी काँग्रेस, मातंग समाज, दिव्यांग यांचे मोर्चे ठरले आक्रमक
Nagpur Winter Session
Nagpur Winter SessionSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू असताना दोन आठवड्यांत निघालेले मोर्चे, धरणे आंदोलन आणि उपोषणांनी उपराजधानीचा परिसर दणाणून गेला होता. यातील आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा, पुण्याहून आलेले मातंग बांधव आणि दिव्यांगांचा आक्रोश मोर्चा हे सगळ्यात आक्रमक होते.

नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला 7 डिसेंबर रोजी प्रारंभ झाला. तेव्हापासून अगदी अधिवेशन संपेपर्यंत म्हणजेच बुधवारी (20 डिसेंबर) सायंकाळी उशिरापर्यंत विधान भवनाच्या परिसरात येणाऱ्या आंदोलनांचा क्रम कायम होता.

एकूणच हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्त कामी राज्यभरातील दहा हजार पोलिस उपराजधानीत पूर्णवेळ तैनात होते. राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ पूर्णवेळ नागपूरात तळ ठोकून होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nagpur Winter Session
Nagpur Winter Session : पुसेसावळीतील हिंसाचारावरुन आमदार अबू आझमी अन् गोरे यांच्यात जुंपली

अधिवेशन सुरू असल्याने राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (CID), राज्य गुप्तवार्ता विभाग (SID), व्हीआयपींसाठी असलेल्या विशेष संरक्षण पथकाचे (SPU) राज्यस्तरीय वरिष्ठ अधिकारी देखील नागपूर पोलिसांच्या मदतीसाठी नागपुरात होते.

हिवाळी अधिवेशन सुरू असताना नागपूर पोलिसांपुढे दरवर्षी मोठा प्रश्न असतो तो, विधान भवनावर धडकणारे मोर्चांचा. नेहमीप्रमाणे यंदाही सीताबर्डी पोलिस ठाण्यापासून काही अंतरावरच असलेल्या 'झिरो माइल्स' चौकातील मॉरिस कॉलेज टी-पॉईंट जवळ पोलिसांनी तात्पुरता मोर्चा पॉईंट उभारला होता.

सीताबर्डीकडून विधान भवनाकडे येणारे मोर्चे मॉरिस कॉलेज चौकात अडवले जात होते. नागपूर मुख्य रेल्वे स्टेशनकडून मॉरिस कॉलेजमार्गे विधानभवनाकडे वळणारे मोर्चेही 'झिरो माइल्स' चौकात पोलिसांनी रोखले. अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या दोन दिवसांत केवळ 9 मोर्चे, 26 धरणे आंदोलन आणि 8 उपोषणांनी त्यांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले.

Nagpur Winter Session
Food Poisoning : खळबळजनक! गडचिरोली आश्रमशाळेच्या शंभरहून अधिक विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा

अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याला सुरुवात झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने मोर्च्यांची संख्या वाढली. 11 ते 15 डिसेंबरदरम्यान तब्बल 69 विविध संघटनांचे मोर्चे विधान भवनावर धडकले. धरणे आंदोलनांची संख्या हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवड्यात 75 झाली. 17 उपोषणांनी सरकार दरबारी त्यांच्या मागण्या रेटण्याचा प्रयत्न केला.

दुसरा आठवड्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा मोर्चा लक्षवेधी ठरला. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या मोर्चाने पोलिसांचे कठडे तोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आक्रमक आंदोलकांना बाळाचा वापर करून पोलिसांनी ताब्यात घेतले. याच काळात पुण्याहून मातंग समाजाचा मोर्चा विधान भवनावर आला. इतर मागास प्रवर्ग विभागाचे मंत्री अतुल सावे हे आंदोलकांना भेटण्यासाठी आले, त्यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली.

तसेच दिव्यांगही आपल्या आंदोलनादरम्यान काहीसे आक्रमक झाले होते. अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्यात मात्र या आंदोलनांची संख्या घटली. 12 मोर्चे, 11 धरणे शेवटच्या दोन दिवसात झाली. या दरम्यान एकही उपोषण पोलिस रेकॉर्डवर आले नाही.

Nagpur Winter Session
Uma Khapare : 'इंद्रायणी'च्या प्रदूषणावरून संतप्त उमा खापरेंचा सरकारला घरचा आहेर, म्हणाल्या...

अधिवेशन सुरू असताना मंगळवारी विधानभवनाच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळ यवतमाळ जिल्ह्यातील युवा शेतकरी सचिन बहादूर यांनी विषारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना वगळता विधिमंडळाच्या सभागृहात गाजली. संपूर्ण अधिवेशन काळात 111 मोर्चे, 121 धरणे आणि 25 उपोषणांची नोंद पोलिस दप्तरी झाली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com