Nagpur ZP News : ‘५० खोके...’ नंतर जिल्हा परिषदेत गाजत आहे ‘१५ टक्के, एकदम ओक्के...’

ZP : रोप-प्रत्यारोप आता जिल्हा परिषदेत होत आहेत.
Nagpur ZP
Nagpur ZPSarkarnama
Published on
Updated on

15 percent, absolutely ok in Nagpur ZP : इतिहासातील सर्वात मोठे बंड करून एकनाथ शिंदे महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात रातोरात चर्चेत आले होते. सुरत, गुवाहाटी, गोवा त्यानंतर मुंबई असा प्रवास करून आल्यानंतर विरोधकांनी ‘५० खोके एकदम ओक्के...’च्या घोषणा दिल्या होत्या. हा नारा खूप गाजला. तसाच आता नागपूर जिल्हा परिषदेत ‘१५ टक्के, एकदम ओक्के..’चा विषय गाजत आहे. (The administration is in its second term with the incumbents)

‘५० खोके.. एकदम ओके’वरून सत्ताधारी व विरोधकांकडून आरोप, प्रत्यारोप करण्यात आले. तसेच आरोप-प्रत्यारोप आता जिल्हा परिषदेत होत आहेत. जिल्हा परिषदेत कॉंग्रेस (Congress) प्रणित महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सत्ता आहे. सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाची दुसरी टर्म सुरू आहे. जिल्हा नियोजनसह इतर काही विकासकामांवर अनेक महिने स्थगितीसारखी स्थिती होती.

मार्च महिन्यात ही परिस्थिती दूर झाली आणि विकासकामांना गती आली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचे विकासकामे मंजूर करणे हे एकच ध्येय होते. यात काहींना यश आले. या विकास कामावरून १५ टक्क्यांची चर्चा सुरू झाली आहे. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून याचा उपयोग होत आहे. काही प्रकरणात तर २० टक्के पर्यंतच्या विषयाची चर्चा झाली.

दोन्ही पक्षांना आवडणारा हा विषय आहे. काहींच्या नातेवाइकांकडून १५ टक्के एकदम ओकेची भाषा करण्यात येत आहे. काही अधिकाऱ्यांकडून याचा सर्रास वापर होत आहे. काही विभाग सर्वांच्या नजरेत आहेत. ‘१५ टक्क्यांचा विषय नवीन नाही. आपल्याकडून पारदर्शीपणे काम असल्याने दिसून पडते’, असे एका अधिकाऱ्याने खासगीत बोलून दाखविले.

Nagpur ZP
Nagpur : आश्‍वासन जनतेच्या कामांचे, लक्ष्य ठेकेदारी; ZP सदस्यांची अशी सुरू आहे धडपड !

कामावर प्रश्नचिन्ह..

काही सदस्यांशी संबंधित नातेवाईक कामे घेत आहेत. तर काही सदस्यांकडून जवळच्या मंडळीसाठी फिल्डिंग लावत असल्याचा जोरदार चर्चा आहे. जिल्हा परिषदेत (ZP) काही कंत्राटदारांकडूनही १५ ते २० टक्क्यांची भाषा होत आहे. काहींच्या मते १० ते १५ टक्के ओके आहे. परंतु काही सदस्यांकडून कामासाठी ‘२० टक्के एकदम ओके’ ची भाषा होत आहे. यामुळे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न निर्माण झाले आहेत.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com