Nagpur ZP News : ग्रीन जिम प्रकरण तापले, माजी पालकमंत्री येणार चौकशीच्या फेऱ्यात !

Collector : जिम मारणे हा सुद्धा कौशल्य विकासाचाच एक भाग आहे.
Grean Gym, Nagpur.
Grean Gym, Nagpur.Sarkarnama
Published on
Updated on

Politics is very heated right now : नागपूर जिल्ह्यातील १० ते १२ गावांमध्ये १३ कोटी रुपये खर्च करून ग्रीन जिम लावण्यात येणार आहेत. यावरून राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. यामध्ये आता माजी पालकमंत्री आणि तत्कालीन जिल्हाधिकारी अडचणीत येणार असल्याचे बोलले जात आहे. (13 crore fund was sanctioned for Green Gym)

गावांमध्ये ग्रीन जिम बसवण्याचे काम ‘कौशल्य विकास’अंतर्गत येत नाही, असे कॉंग्रेसचे रामटेक विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख आणि पंचायत समितीचे माजी उपसभापती उदयसिंह ऊर्फ गज्जू यादव यांनी स्पष्टपणे सांगितले, तर विविध क्षेत्रांतील लोकांना प्रशिक्षण देऊन कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याला शासन कौशल्य विकास म्हणते आणि जिम मारणे हा सुद्धा कौशल्य विकासाचाच एक भाग आहे, असे विद्यमान जिल्हाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत कौशल्य विकास लेखाशीर्ष अंतर्गत जिल्ह्यातील २०० गावांमध्ये ग्रीन जिमसाठी १३ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. हा प्रकार पैशाची उधळपट्टी असून याची चौकशी झाल्यास माजी पालकमंत्री नितीन राऊत व तत्कालीन जिल्हाधिकारी आर. विमला चौकशीच्या फेऱ्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

रामटेकचे खासदार खासदार कृपाल तुमाने यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशीची भाषा केली आहे. खनिज निधीतून रामटेक, उमरेड, कुही, भिवापूर, कामठी, मौदा, नागपूर ग्रामीण, पारशिवनी, सावनेर, नरखेड व कळमेश्वर तालुक्यातील २०० गावांत जिमचे साहित्य लावण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेकडून १३ कोटींची एकमेव निविदा प्रसिद्ध करण्यात आली.

Grean Gym, Nagpur.
Nagpur ZP News : कंत्राटदारांना दिली २८ कामे, एकही सुरू नाही; अध्यक्षांचे आदेशही धुडकावले !

मे फ्रेण्डस स्पोर्ट नामक कंपनीची १२ लाख ९९ हजार ६० हजारांची निविदा मंजूर करण्यात आली. एका गावात साधारणतः ६ लाख ४९ हजार ८०० रुपयांचे ग्रीन जिम लागणार असून त्यात आठ साहित्य राहणार आहेत.

केंद्रीय खनिकर्म मंत्रालयाच्या आदेशानुसार राज्य शासनानेही (State Government) खनिज निधीतून करण्यात येणाऱ्या कामाबाबत काही निकष निश्चित केलेत. पाणी, पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण, आरोग्य, शिक्षण, स्वच्छतेसह इतर काही बाबींवर खर्च करता येते.

१३ कोटींचा निधी कौशल्य विकास लेखाशीर्ष अंतर्गत मंजूर करण्यात आला. आधी निधी खर्चाचे अधिकार जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे देण्यात आले होते. परंतु नंतर ते जिल्हा परिषदेच्या (ZP) बांधकाम विभागाकडे देण्यात आले. या प्रकरणात घोळ असल्याचा आरोप कॉंग्रेस (Congress) नेत्यांकडून होत आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com