Nana Patole : अरेरे..! काल आंबेडकरांनी हाकलले, आज नानांनी दाखवला बाहेरचा रस्ता !

Congress Meeting : ‘हे’ माजी आमदार, 'सेवक' असूनही झाली दयनीय अवस्था. निमंत्रण नसल्याने नानांनी त्यांना जाण्यास सांगितले.
Nana Patole and Sevak Waghaye
Nana Patole and Sevak WaghayeSarkarnama

Nana Patole : काँग्रेसचे आमदार राहिले आणि अनेक वर्षे काँग्रेसची सेवाही केली, तरी माजी आमदार सेवक वाघाये यांची अवस्था दयनीय झाली आहे. काल 'वंचित'च्या ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बोलण्यास नकार देत एकप्रकारे हाकलून दिल्यावर आज मुंबईच्या टिळक भवनात सुरू असलेल्या काँग्रेसच्या बैठकीतून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही सेवक वाघाये यांना आपण निमंत्रित नाही, असे म्हणत बाहेरचा रस्ता दाखविला.

माजी आमदार सेवक वाघाये यांचे हाल सुरू झाले आहेत. मुंबईच्या टिळक भवनात मुंबई वगळता 22 पैकी 19 लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात आज (ता. 5) एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठक अजूनही सुरू आहे. या बैठकीला बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित आहेत.

लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा फ्रंटल सेल, आमदार-खासदार, माजी आमदार, माजी खासदार आणि जिल्हाध्यक्ष यांना निमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान, भंडारा-गोंदिया लोकसभेचा आढावा घेण्यासाठी 12 वाजता बैठक सुरू झाली. अचानक या बैठकीला माजी आमदार सेवक वाघाये यांची एन्ट्री झाली. त्यांना बघताच नाना पटोले यांचा पारा सरकला आणि त्यांनी चक्क ज्यांना या बैठकीला निमंत्रित करण्यात आले आहे, त्यांनीच या बैठकीला उपस्थित राहावे, असे फर्मान सोडले. साहजिकच सेवक वाघाये यांना निमंत्रण नसल्याने नानांनी त्यांना जाण्यास सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nana Patole and Sevak Waghaye
Nana Patole : ‘समृद्धी’ला शिंदे-फडणवीसांच्या भ्रष्टाचाराचे भगदाड

नाना पटोले आणि सेवक वाघाये यांच्यात वाकयुद्ध पेटले. दोघांत खडाजंगी रंगल्याचे विश्वसनीय सूत्राद्वारे सांगण्यात आले आहे. या वेळी सेवक वाघाये यांनी आपण नाना पटोले यांना आमदार बनवण्यासाठी काय काय केले, याचा पाढाच वाचून दाखवला. आपण इतकी वर्षे काँग्रेस पक्षाची सेवा केल्याचा हिशेबही सेवक वाघाये यांनी तेथे दिला. दरम्यान, सेवक वाघाये नानांशी वाद घालत आरडाओरड करत निघाल्याचे सांगण्यात येत आहे. सेवक वाघाये यांच्या गोंधळाने सुरू असलेल्या बैठकीमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

ही बैठक केवळ पक्षाच्या लोकांची असून, सेवक वाघाये यांचा अद्यापही पक्ष प्रवेश झाला नसल्याने त्यांना बैठकीला उपस्थित राहण्याचा अधिकार नाही. म्हणून त्यांना बाहेर काढण्यात आल्याचा दुजोरा दिला आहे. शिवाय काल वंचितचे प्रकाश आंबेडकर यांना भेटून आल्याने सेवक वाघाये यांचे तळ्यात आणि मळ्यात सुरू असल्याचेही सांगण्यात आले आहे. हे सर्व असले तरी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी आमदार सेवक वाघाये यांचा आपसातील वाद अद्याप मिटला नसल्याचे या घटनेमुळे पुन्हा एकदा समोर आले आहे.

Edited By : Atul Mehere

R

Nana Patole and Sevak Waghaye
Nana Patole : विधिमंडळाच्या लॉबीतच आमदारांची धक्काबुक्की; नाना पटोले भडकले, म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com