Nana Patole On Ram Mandir : भाजपला भगवान श्रीरामांना राजकारणात आणायचं होतं !

Mahavikas Aghadi : भाजपने घेतलेल्या सर्वेमध्ये 40 जागा महाविकास आघाडीला दाखवल्या गेल्या आहे.
Nana Patole, Sharad Pawar, Ajit Pawar and Narendra Modi
Nana Patole, Sharad Pawar, Ajit Pawar and Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Congress Political News : आमचे धर्मगुरू शंकराचार्य यांनी २२ जानेवारीच्या समारंभाबद्दल मत मांडले आहे. धर्माचे रक्षण करणे हे काम धर्मगुरूंचे असते भगवान राम कुठल्या पक्षाचे नाहीत. राम मंदिराचं काम अजूनही अर्धवट आहे. ‘मंदिर वही बनायेंगे...’, म्हणत देशात उद्रेक निर्माण करणाऱ्या भाजपने चार किलोमीटरवर भगवान श्रीरामाचं मंदिर बांधलं. भाजपला भगवान श्रीरामांना राजकारणात आणायचं होतं, असे म्हणत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार पटोलेंनी भाजपवर कडाडून प्रहार केला.

नाना पटोले अमरावतीच्या विभागीय बैठकीसाठी नागपुरातून निघण्यापूर्वी आज (ता. १८) नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, भाजपने घेतलेल्या सर्वेमध्ये 40 जागा महाविकास आघाडीला दाखवल्या गेल्या आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारक आहेत. ते पंतप्रधान कमी आणि प्रचारक जास्त आहेत. त्यामुळे ते प्रचारासाठी अधूनमधून महाराष्ट्रात येत असतात, असा टोला नाना पटोले यांनी लगावला.

Nana Patole, Sharad Pawar, Ajit Pawar and Narendra Modi
Nana Patole : काँग्रेसचे फायरब्रँड नेते नाना पटोले...

महाविकास आघाडीचे जागावाटप ठरलेले आहे. योग्य वेळी आम्ही जागा डिक्लिअर करू. संघटनात्मक पातळीवर काँग्रेस मजबूत आहे. निकालही महाविकास आघाडीच्या बाजूने पाहायला मिळेल. प्रकाश आंबेडकर असो की फॉर्म्यूला असो, प्रक्रिया सुरू होताना योग्य वेळी ते पाहायला मिळेल. सगळ्यांचा समावेश त्यामध्ये असेल.

संभाजी राजेंनी कर्नाटकला दिलेल्या इशाऱ्याबद्दल विचारले असता, मला त्याबद्दल फारसं माहिती नाही, असे ते म्हणाले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावरील ईडीच्या कारवाईबद्दल छेडले असता, ‘ईडी पे जादा फोकस मत करो...’, असे म्हणत नानांनी विषय संपवला.

जितेंद्र आव्हाड काय बोलले, हे मला माहिती नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शोषित पीडित लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलं. त्यांनी संविधानात व्यवस्था निर्माण केली आहे. बाबासाहेबांचे हे उपकार कोणालाही नाकारता येणार नाही, असे पटोले जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर बोलताना म्हणाले.

अजित पवारांनी मोदींचेही वय विचारावे..

अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचेसुद्धा वय विचारले पाहिजे. मग त्यांची खरी हिंमत दिसेल. सोशल मीडियावर फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. गिरीश महाजन आणि अजित पवार यांची काय हालत करून ठेवली, त्या व्हिडिओत आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे आपल्या काकांचं वय विचारण्यापेक्षा त्यांनी मोदी साहेबांचे वय विचारले पाहिजे, असे म्हणत नाना पटोलेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना डिवचले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

धंगेकर घेणार दिवे वाटण्याचा कार्यक्रम..

आमचे नेते राहुल गांधी यांनी परवा (ता. १६) जाहीर केलं आहे. ज्या - ज्या धर्मातले राजकीय नेते आमच्या पक्षात येतील त्यांना त्यांच्या धर्माचं काम करायला विरोध नाही. हा त्याच्या आस्थेचा विषय आहे. धंगेकर काहीतरी नवीन करत आहे. याला वेगळं म्हणायचं कारण नाही. रामाचा ठेका फक्त भाजपलाच दिलाय, असं वरिष्ठ नेते बोलत आहे. यावरून त्यांचा घमेंड वाढलेला असल्याचा दिसून येत आहे. स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांच्याबाबत बोलण्याचे नाना पटोले यांनी सपशेल टाळले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com