Nagpur, 31 May : नागपूर लोकसभेचा निकाल धक्कादायक लागण्याची शक्यता सर्वत्र वर्तविली जात असली तरी भारतीय जनता पक्षाचे नेते मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विजयावर ठाम आहेत. दुसरीकडे काँग्रेस इतिहास घडवणार असा दावा विकास ठाकरे यांचा समर्थकांकडून केला जात आहे. वास्तविक मागील निवडणुकीत नाना पटोले यांनी गडकरी यांचे मताधिक्य कमी करण्यात यश मिळविले होते, त्यामुळे आमदार विकास ठाकरे आता कोणता चमत्कार घडविणार, याकडे नागपूरचे लक्ष लागले आहे.
स्वतः नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे पाच लाखांच्या मताधिक्याने आपण निवडून येणार असल्याचा दावा करीत आहे. काँग्रेसचे उमेदवार आणि पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे (Vikas Thakre) यांनी मतदान आटोपल्यानंतर आपण एक लाखाच्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचे सांगितले आहे. ते आजही एक लाखाच्या आकड्यावर ठाम आहेत. त्यांचे समर्थक मात्र 50 हजारांचा आकडा सांगत आहेत. स्वतः ची प्रतिमा, भरघोस विकास कामे हे गडकरी यांचे भांडवल आहे. तेच त्यांना तारणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शहरातील बहुतांश मतदार पक्षानिहाय विभागलेला नाही. सर्वसामान्य नागरिक फारसे कुठल्याच राजकीय भानगडीत पडत नाहीत, त्यामुळे विरोधकांच्या संविधान बदलण्याचा आरोपांचा सर्वसामान्यांच्या मतांमध्ये फरक पडणार नसल्याचे भाजपच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. दहा वर्षांपासून सत्तेत असल्याने भाजपवर थोडीफार नाराजी आहे. मोदी आणि शाह यांच्या राजकारणाचा फटका भाजपच्या मतांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही अनेक भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीमुळे रिपब्लिकन पक्ष, मुस्लिमांची मते विभाजित झाली नाहीत. संविधानाचा मुद्दा चांगलाच गाजला. लोकांच्या मनात शंका निर्माण झाली, त्यामुळे काँग्रेसच्या मतांचा टक्का निश्चितच वाढणार असल्याचे सांगण्यात येते. जातीय समीकरण, भाजपविषयी नाराजी, विकास ठाकरे यांचे नेटवर्क, महाविकास आघाडीचा प्रयोग आणि काँग्रेसमधील नेत्यांचे मतभेद या वेळी विकोपाला गेले नाहीत. याचा फायदा या निवडणुकीत काँग्रेसला होण्याची शक्यता आहे.
विलास मुत्तेमवार काँग्रेसचे उमेदवार असताना गडकरी ते तीन लाखांच्या मताधिक्यांनी निवडून आले होते. मागील 2019 च्या निवडणुकीत नाना पटोले यांनी त्यांचे मताधिक्य कमी केले. ते अडीच लाखांवर आणले होते. विकास ठाकरे हे काय चमत्कार करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाकरे कागदावर कितीही दमदार उमेदवार वाटत असले तरी अडीच लाखांचे मताधिक्य कमी करणे अवघड असल्याचे सांगण्यात येते.
येत्या 4 जूनला लोकसभेची मतमोजणी होणार आहे. अवघ्या काही तासांत निकाल हाती येणार आहे. मोदी आणि शाह यांचे स्पर्धक असल्याने गडकरी यांच्या निकालाकडे भाजपही बारईकाने लक्ष ठेवून आहे.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.