Chhagan Bhujbal Vs Hasan Mushrif : जितेंद्र आव्हाडांची पाठराखण केल्याबद्दल राष्ट्रवादीचा बडा नेता भुजबळांवर नाराज

Jitendra Awhad support Issue : अजित पवार गटाचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी मनुस्मृतीमधील श्लोकांचा विषय मागे पडायला नको म्हणत आव्हाड यांची पाठराखण केली होती. त्यावरून अजित पवार गटातील दोन कॅबिनेट मंत्र्यांमध्ये जुंपली आहे.
Chhagan Bhujbal Vs Hasan Mushrif
Chhagan Bhujbal Vs Hasan MushrifSarkarnama

Mumbai, 31 May : आमदार जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील दोन कॅबिनेट मंत्र्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. आमचे नेते छगन भुजबळ यांनी आव्हाडांना पाठिंबा देण्याबाबत केलेले वक्तव्य दुर्दैवी आहे. उलट भुजबळ यांनी आव्हाडांना त्या प्रकरणात खडे बोल सुनावले पाहिजे होते, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण करणाऱ्या भुजबळ यांच्याबद्दल कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

शैक्षणिक अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील दोन श्लोकांचा समावेश करण्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी महाडमधील चवदार तळ्याकाठी आंदोलन केले होते. त्या आंदोलनादरम्यान आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला होता. त्या प्रकरणी अजित पवार गटाचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनुस्मृतीमधील श्लोकांचा विषय मागे पडायला नको म्हणत आव्हाड यांची पाठराखण केली होती. त्यावरून अजित पवार गटातील दोन कॅबिनेट मंत्र्यांमध्ये जुंपली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण करताना छगन भुजबळ म्हणाले, मनुस्मृतीचा समावेश आपल्या शालेय अभ्यासक्रमात होता कामा नये. त्यावर भर द्या ना. त्याचा निषेध आणि विरोध करा. जितेंद्र आव्हाड तुमचे राजकीय विरोधक आहेत, त्यांचा निषेध करण्याबद्दल आमचा काहीही म्हणणं नाही. पण आमच्या शालेय अभ्यासक्रमात मनृस्मृतीचा उल्लेख नका, हेही सांगा. जी मनुस्मृती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जाळली, ती तुम्ही जाळा, असे आवाहन भुजबळ यांनी विरोधकांसह स्वकीयांनाही केले आहे.

Chhagan Bhujbal Vs Hasan Mushrif
Sangola politics : सांगोल्यात कमळाचा बोलबोला; पण शहाजीबापू अन्‌ डॉ. देशमुखांची लिट्‌मस टेस्ट

जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याने संपूर्ण देशात संतप्त भावना आहेत. आव्हाड यांनी कितीही माफी मागितली तरी त्यांनी केलेले पाप धुवून जाईल, असं मला वाटत नाही. आव्हाड यांना प्रायश्चित घ्यावे लागेल, असा इशारा कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांनी आव्हाड यांना दिला आहे.

आव्हाड यांची पाठराखण केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी भुजबळ यांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली आहे.ते म्हणाले, आमचे नेते छगन भुजबळ यांनी मनुस्मृतीचा विषय बाजूला पडेल म्हणून आव्हाड यांना पाठिंबा देण्याचे वक्तव्य केले, हे अतिशय दुर्दैवी आहे. वास्तविक भुजबळ यांनी आव्हाड यांना खडे बोल सुनावले पाहिजे होते. त्यांनी केलेला प्रकार अतिशय चुकीचा आहे, हे त्यांना सांगण्याची आवश्यकता होती. ते भुजबळ यांनी केले नाही, हे फार दुर्दैवी आहे.

Chhagan Bhujbal Vs Hasan Mushrif
Jitendra Awhad : सोलापुरात जितेंद्र आव्हाडांच्या पोस्टरला महायुतीने मारले जोडे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com