अकोला : जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवाराचा प्रचार काँग्रेसचे नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणामुळे काँग्रेसमध्ये (Congress) खळबळ उडाली आहे. त्यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देशमुखांना कारवाईचा इशारा दिला आहे. (Nana Patole warned Ashish Deshmukh to take action)
पटोले अकोल्यामध्ये बोलत होते. यावेळी ते म्हणाले, पक्ष विरोधी कारवाई करणारा कोणी कितीही मोठा असो त्याच्यावर कारवाई होणारच. माझ्याकडे जी माहिती आली आहे, त्या माहितीची एकदा निरीक्षक नियुक्त करून पडताळणी करणार. त्यानंतर कारवाई करण्यात येईल, असे पटोले यांनी स्पष्ट केले. त्यामुळे देशमुख यांच्यावर काय कारवाई होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजप उमेदवाराचा प्रचार देशमुख यांना भोवणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, देशमुख यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजप उमेदवार पार्वता काळबांडे यांच्या प्रचारासाठी सावरगाव येथील त्यांच्या निवासस्थानी भाजप नेत्यांसोबत बैठक घेतली असल्याचे समजते. या बैठकीला भाजपचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीचे फोटो व्हायरल झाले असल्याने देशमुख यांची डोकेदुखी वाढली आहे.
आशिष देशमुख आणि राज्याचे पशूसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्यामध्ये सध्या वाद सुरु आहे. त्या संदर्भात देशमुख यांनी पक्षश्रेष्ठीकडे केदार यांची तक्रार देखील केली होती. देशमुख यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव म्हणून निवड करण्यात आली आहे. देशमुख काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सुनील केदार पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत. त्यासाठी ते विविध ठिकाणी सध्या सभा घेत आहेत. केदार काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करत असल्यामुळे तर देशमुख यांनी भाजप उमेदवाराची भेट घेतली नाहीना अशी चर्चा नागपूरमध्ये सुरु आहे. मात्र, केदार आणि देशमुख यांच्यातील वादामुळे पक्षाच्या उमेदवाराचे टेन्शन मात्र वाढले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.