डॉ. मोहन भागवत यांच्या ‘या’ भूमिकेचे नाना पटोलेंनी केले स्वागत…

त्यांनी आमच्या नेत्यांना सकारात्मक प्रतिसाद द्यावा आणि महाराष्ट्राची परंपरा कायम राखावी, अशी अपेक्षा नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केली.
Nana Patole News in Marathi, Mohan Bhagwat News
Nana Patole News in Marathi, Mohan Bhagwat NewsSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : देशात धर्मांधता वाढत चालली आहे. याबाबत कॉंग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांनी उदयपूर येथील चिंतन शिबिरात जे वक्तव्य केले, त्याचे समर्थन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. सरसंघचालकांच्या या भूमिकेचे स्वागत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. (Nana Patole News in Marathi)

अमरावती (Amravati) येथे धनगर समाजाच्या मेळाव्यासाठी आले असता पटोले माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, गांधी परिवाराची देशाप्रति त्यागाची भूमिका जनतेला माहिती आहे. गांधी परिवाराला हात जरी लावण्याचा प्रयत्न केला, तर कॉंग्रेस कार्यकर्त्यांसह देशातील सामान्य माणूस पेटून उठेल. त्यामुळे धर्मांधता पसरविणाऱ्या कुणीही प्रयत्न करू नये, असा इशारा पटोले यांनी दिला. सोनिया गांधी (Soniya Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या विरोधात ईडीची कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली आहे. त्याबाबत विचारले असता त्यांनी उपरोक्त इशारा दिला. सोनिया गांधी यांनी जे विधान केले, त्याचे समर्थन डॉ. भागवत यांनी केले, याचे आम्हाला समाधान आहे, असेही नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.

भाजपने निवडणुकीला गालबोट लावू नये..

कोणत्याही निवडणुकीत मते विकत घेण्यात भाजप आघाडीवर आहे. पण त्यांनी या निवडणुकीला गालबोट लावू नये. राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घ्यायला काही तास शिल्लक आहेत. तर महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली. मात्र विरोधी पक्षांनी काही अटी ठेवल्या. त्यावर नाना पटोले म्हणाले, राज्यसभा निवडणूक बिनविरोध करा आणि महाराष्ट्रातील सलोखा कायम ठेवा. घोडेबाजार होऊ नये यासाठी योग्य निर्णय घ्या. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न करू, असेही पटोले म्हणाले.

Nana Patole News in Marathi, Mohan Bhagwat News
नाना पटोले म्हणाले, भाजपच्या गर्वाचे लवकरच हरण होईल...

भाजपच्या सातव्या उमेदवाराने माघार घ्यावी..

राज्यसभा व विधानपरिषदेच्या निवडणुका बिनविरोध व्हाव्या आणि हीच महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे. त्यामुळे भाजपचा सातव्या उमेदवाराने माघार घ्यावी, यासाठी महाविकास आघाडीचे नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भेटून प्रयत्न करीत आहे. त्यांनीही आमच्या नेत्यांना सकारात्मक प्रतिसाद द्यावा आणि महाराष्ट्राची परंपरा कायम राखावी, अशी अपेक्षा नाना पटोले यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com