नाना पटोले निंदा प्रस्ताव आणून राज्यपाल कोश्‍यारींची हकालपट्टी करणार...

मी उद्याच मुंबईला (Mumbai) जाऊन राज्यपालांच्या (Governor) विरोधात निंदा प्रस्ताव आणण्याची तयारी करणार आहे, असेही नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama

भंडारा : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द उद्गारून केलेल्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील नेते पेटून उठले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यासह महाविकासच्या नेत्यांनी राज्यपालांचा चांगलाच समाचार घेतला. याही उपर जाऊन निंदा प्रस्ताव आणून राज्यपाल कोश्‍यारींची हकालपट्टी करणार असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज सांगितले.

नाना पटोले (Nana Patole) आज गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील प्रतापगढ येथे महाशिवरात्रीनिमित्त आले होते, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नाना पटोले किती आक्रमक नेता आहेत, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनाही माहिती आहे. ते प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून महाराष्ट्र कॉंग्रेसमध्ये (Congress) त्यांनी जान फुंकली आहे. त्यामुळे आज केलेल्या त्यांच्या वक्तव्याला अधिक महत्व आहे, असे कॉंग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये बोलले जात आहे. कोश्‍यारींची हकालपट्टी करणार असे जर नाना पटोले यांनी म्हटले आहे, तर ते त्यांना महाराष्ट्रातून (Maharashtra) हाकलल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्‍वास कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना आहे.

राज्यपालांनी परवा पुन्हा महाराष्ट्राचे दैवत शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलून आपल्या राजांचा अपमान केला आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हेच काम केले आहे. त्यांचाच कित्ता आता राज्यपाल गिरवत आहेत. मोदींनी तर महाराष्ट्राला बदनाम करण्याचा जणू विडाच उचलला आहे. महाराष्ट्रामुळे देशात कोरोना पसरला, असे हास्यास्पद विधान त्यांनी केलेले आहे. आता राज्यपाल कोश्‍यारी आपल्या राजांबद्दल अपमानास्पद विधान करून नरेंद्र मोदी छत्रपतींपेक्षा मोठे आहे, असा भास निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आता महाराष्ट्रात हे अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असे नाना पटोले म्हणाले.

Nana Patole
नाना पटोले, बच्चू कडू, आशिष देशमुख, संजय काकडेंचे फोन रश्मी शुक्लांनी केले टॅप

महाराष्ट्र हे स्वाभिमानी राज्य आहे. त्यांनी सतत महाराष्ट्राचा अपमान करायचा आणि आम्ही आपली संस्कृती जपायची, हे आता खूप झाले. यापुढे अपमान सहन केला जाणार नाही. महाराजांचा अपमान करण्याची शृंखलाच भाजपने सुरू केली आहे. आता त्यांना क्षमा केली जाऊ शकत नाही. मी उद्याच मुंबईला जाऊन राज्यपालांच्या विरोधात निंदा प्रस्ताव आणण्याची तयारी करणार आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com