
Yavatmal News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या गावातून शेतकऱ्यांसोबत ''चाय पे चर्चा' करून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला होता. त्याच यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी गावातून काँग्रेसने मंगळवारी (ता.3) शेतकऱ्यांसाठी आंदोलन छेडले आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दाभडीतील शेतकऱ्यांसोबत चर्चा केली आणि मोदींच्या कार्यकाळात शेतमाल सोडून सर्व वस्तुंच्या किंमती वाढल्याचा आरोप केला .सोबतच पंतप्रधान मनमोहसिंग आणि नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अकरा वर्षांत शेतकऱ्यांसाठी कोणी काय केले याची माहिती देऊन त्यांनी भाजपला आरसा दाखवला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 मार्च 2014 मध्ये दाभडी येथे भेट दिली होती. त्यावेळी नुकसान झालेल्या पिकांची पाहणी त्यांनी केली होती. शेतकऱ्यांसोबत चाय पे चर्चा केली. त्यामुळे दाभडी गाव एकदम चर्चेत आले होते. यावेळी त्यांनी भाजप सत्तेत आल्यास काय काय करणारे असे सांगून तब्बल 19 आश्वासने शेतकऱ्यांना दिली होती. याचा समाचार सपकाळ यांनी घेतला.
ते म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी देशभरातील शेतकऱ्यांना दिलेल्या वचनांपैकी एकही पूर्ण केले नाही. उलट शेतकऱ्यांपेक्षा उद्योगपतींच्या हितासाठीच निर्णय घेतले. शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यासाठी केंद्र शासनाला वेळ नाही. गेल्या दहा वर्षांत हमीभावामध्ये केवळ 45 टक्के वाढ करण्यात आली.
डॉ. मनमोहनसिंग (Manmohan Singh) यांच्या दहा वर्षांच्या काळात १२० टक्के पेक्षा जास्त वाढ करण्यात आली होती. युपीएच्या काळातच खत, कीटकनाशकांवर सबसिडी होती. डिझेलचे दर कमी होते. गेल्या दहा वर्षांचा काळ बघितला तर उलट स्थिती आहे. खत, बियाणे, कीटकनाशकांसोबत डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. हा प्रकार शेतकऱ्यांच्या जिवावर उठल्याचा आरोपही सपकाळ यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनांपैकी किती आश्वासने पूर्ण केली असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी एकदा शासनाने डोळे उघडून बघावे, शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी एखादा तरी निर्णय घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकाराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, खासदार प्रतिभा धानोरकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील, जिल्हाध्यक्ष प्रफुल मानकर, तातु देशमुख, स्वाती येंडे आदी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.