
Nagpur News : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात अनेकांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमागचा 'आका' वेगळाचा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
यावर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने स्थानिक हेवे-दावे आणि राजकाराणासाठी ओबीसी नेतृत्वाला बदनाम केले जात असल्याची शंका व्यक्त केली आहे. त्यामुळे आता मराठाविरुद्ध ओबीसी, असा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
'एखाद्या समाजाच्या दाबावापोटी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्यास ओबीसी (OBC) समाज खपवून घेणार नाही, असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी दिला आहे. सरपंच देशमुख यांच्या हत्येचा तपास पोलिस यंत्रणेमार्फत सुरू आहे. धनंजय मुंडे दोषी असेल, तर त्यांचे कायद्यानुसार काय करायचे ते ठरवण्याचा निर्णय पोलिस आणि न्यायपालिकेचा आहे', असे तायवाडे यांनी ठणकावून सांगितले आहे.
'पोलिस आणि न्यायपालिकेच्या निर्णयात आम्ही पडणार नाही. अद्याप तपास यंत्रणेच्यावतीने त्यांचा या प्रकरणात थेट संबंध असल्याचे सांगण्यात आलेले नाही. तसेच काही पुरावे व धागेदोरेसुद्धा आढळलेले नाही. या संपूर्ण प्रकरणात धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा सहभाग आहे हे सुद्धा तपासण यंत्रणेने जाहीर केलेले नाही. असे असताना उठसूट धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे, हे योग्य नाही', असेही तायवाडे यांनी म्हटले.
काही नेते आणि त्यांचे विरोधक सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते. स्थानिक राजकारणातून ओबीसी नेतृत्वात बदनाम केले जात असल्याचे दिसून येते. कोणाच्या सांगण्यावरून किंवा सुडापोटी मुंडे यांचा राजीनामा घेतल्यास ओबीसी समाज स्वस्थ बसणार नाही. धनंजय मुंडे ओबीसी समाजाचे मोठे व वजनदार नेते आहेत. त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर आम्हीसुद्धा रस्त्यावर उतरू, असा इशारा बबनराव तायवाडे यांनी दिला.
मंत्रिमंडळाचा विस्तार होताच सरपंच देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण समोर आले होते. विरोधकांनी हा विषय विधानसभेत उपस्थित केला होता. त्यामुळे मंत्री मुंडे अधिवेशनात फिरकले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपांवर विधानसभेत उत्तर दिल्यानंतर मुंडे विधानसभेत दाखल झाले होते. माझ्यावर उपस्थित केलेल्या शंकेवर मुख्यमंत्री उत्तर देणार असल्याने आपण मुद्दामच अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी झालो नव्हतो, असा खुलासा त्यावेळी मुंडे यांनी केला होता. हा वाद आणखीच चिघळल्याने मुंडे यांना पालकमंत्रीसुद्धा करण्यात आलेले नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.