Amravati News : अमरावतीच्या लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत कौर राणा यांना जिवे मारण्याची धमकी आल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही धमकी आल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे आता थेट एका विद्यमान महिला खासदारालाच जिवे मारण्याची धमकी आल्याने याबाबत खळबळ उडाली आहे. (Amaravati MP Navneet Rana Threat Call News)
खासदार नवनीत राणा यांना व्हाॅट्स अॅप कॉलच्या माध्यमातून ही धमकी आल्याचे समजते. पाकिस्तान आणि अफगणिस्तानमधून ही धमकी आल्याची प्राथमिक माहिती आहे. खासदार राणा यांना व्हाॅट्स अॅपवर धमकी आल्याची माहिती आहे. राणा यांचे स्वीय सहायक विनाेद गुहे यांनी राजापेठ पोलिस ठाण्यात या संदर्भात तक्रार आली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राणा यांचे स्वीय सहायक विनोद गुहे यांच्या तक्रारीनंतर धमकीचा फोन कॉल करणाऱ्या अज्ञातांविरुद्ध कलम 354 A, 354 D, 506 (2), 67 अन्वये गुन्हे दाखल केले गेले आहेत. यापूर्वीही खासदार राणांना धमक्या आल्या हाेत्या.
पोलिसांनी (Police) सांगितल्यानुसार, खासदार राणा यांना एका विदेशी क्रमांकावरून जिवे मारण्याची देण्यात आली आहे. राणा यांना अश्लाघ्य शिव्या आणि जिवे मारण्याची धमकी दिली गेली होती. तीन मिनिटांच्या अवधीचा हा व्हिडिओ आहे.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना मागच्या आठवड्यात कोर्टाचा जोरदार दणका बसला होता. राणा यांना वैध जातप्रमाणपत्र बहाल करण्यास महाराष्ट्र सरकारने नंकारघंटा वाजवली होती. शीख, चांभार या दस्तावेजाच्या आधारे मोची या जातीचं प्रमाणपत्र देणे शक्य होणार नाही, असं त्यांना सागण्यात आलं होते. सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारच्या वतीने याबाबत स्पष्टीकरण दिले गेले आहे. त्यामुळे खासदार राणांना हा मोठा दणका असल्याचे बोलले जात होते.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.