Gadchiroli : माओवाद्यांकडून हिंदूरमध्ये चार वाहनांची जाळपोळ

Panic Situation : हिदूर-दोबूर-पोयारकोटी मार्गावरील घटनेने आदिवासी ग्रामस्थांमध्ये दहशत
Vehicles burnt by Maoists in Gadchiroli.
Vehicles burnt by Maoists in Gadchiroli.Sarkarnama
Published on
Updated on

Naxal Action : काही दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी पुन्हा डोके वर काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. एकापाठोपाठ हत्यासत्रानंतर आता त्यांनी हिदूर-दोबूर-पोयारकोटी मार्गावर रस्ता बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची जाळपोळ केलीय.

भामरागड तालुक्यातील हिदूर या दुर्गम गावाजवळ मंगळवारी (ता. 19) रात्रीतून ही जाळपोळ करण्यात आली. बुधवारी (ता. 20) सकाळी हा प्रकार उजेडात आला. त्यानंतर गडचिरोली पोलिस व सी-60 कमांडो पथकांनी या भागात अभियानाला सुरुवात केली आहे.

Vehicles burnt by Maoists in Gadchiroli.
Gadchiroli Naxal : टिटोळातील पोलिस पाटलाच्या हत्येप्रकरणी कट्टर जनमिलिशियास अटक

रस्त्याच्या बांधकामासाठी हिदूर गावाजवळ कंत्राटदाराने तीन ट्रॅक्टर व एक जेसीबी मशिन लावली होती. मंगळवारी सायंकाळी काम आटोपून श्रमिकांनी ही वाहने रस्त्याच्या कडेला उभी केली होती. रात्री माओवाद्यांनी हिदूर गाव गाठले आणि ही वाहने पेटवून दिली. हिदूर गावापासून काही अंतरावर हा प्रकार घडला. रात्री आदिवासी ग्रामस्थ घटनास्थळाकडे जाण्यास धजावले नाही. बुधवारी सकाळी याची माहिती पोलिसांना मिळाली.

जाळपोळीबद्दल माहिती मिळताच भामरागड पोलिस आणि कमांडो पथक हिदूरकडे रवाना झाले. पोलिसांनी पंचनामा करीत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हिदूर गावातही माओवादी येऊन गेल्याची माहिती आहे. माओवाद्यांनी जाळपोळीच्या ठिकाणी हिंदी भाषेतील पत्रके टाकली आहेत. त्यात 22 डिसेंबरला माओवाद्यांनी ‘भारत बंद’ पुकारल्याचे जाहीर केले आहे. हा बंद यशस्वी करण्याचे आवाहन माओवादी नेत्यांनी या पत्रकाच्या माध्यमातून केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अलीकडेच गडचिरोलीत येऊन गेले. त्यानंतर माओवाद्यांनी पोलिसांचे खबरे असल्याचा ठपका ठेवत काही आदिवासींची हत्या करण्यास सुरुवात केली. या घटना घडत असताना पोलिसांनी पोलिस पाटलाच्या हत्येप्रकरणी एका कट्टर जनमिलिशियास अटक केली. अगदी दोन ते तीन दिवसांपूर्वी झालेल्या एका चकमकीत 15 पोलिसांचे स्फोटात प्राण घेणाऱ्या माओवादी उपकमांडरलाही ठार करण्यात आले. एटापल्ली तालुक्यातील तोडगट्टाजवळ आदिवासी नेत्यांच्या मदतीने पोलिसांना घेराव घालत मोठा घातपात घडविण्याचे माओवाद्यांचे षडयंत्र होते. परंतु ते यशस्वी झाले नाही.

अलीकडच्या काळात वेगाने घडलेल्या या घडामोडींमुळे बॅकफूटवर गेलेल्या माओवाद्यांनी ही जाळपोळ केल्याचे सांगण्यात येत आहे. गडचिरोली जिल्ह्याला लागूनच माओवादग्रस्त तेलंगणा आणि छत्तीसगडच्या सीमा आहेत. या भागात गडचिरोली पोलिस आणि केंद्रीय सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात घेराबंदी केली आहे. त्यामुळे गडचिरोलीतून या दोन राज्यात पळून जाताना माओवाद्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हा वाढलेला दबाव पाहता जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी घातपात घडवित पोलिसांना भरकटविण्याचा प्रयत्न माओवादी करीत आहेत.

Edited by : Prasannaa Jakate

Vehicles burnt by Maoists in Gadchiroli.
Gadchiroli : स्फोटात 15 पोलिसांचे जीव घेणारा कसनसूर उपकमांडर दुर्गेश वट्टी धाडला यमसदनी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com