Farmer Agitation : दिल्लीतील आंदोलनात माओवाद्यांचा सहभाग; यंत्रणेने दिला ‘अलर्ट’

IPS Sandip Patil : महाराष्ट्र नक्षलविरोधी पथकाची गुप्त माहिती
IPS Sandip Patil
IPS Sandip PatilSarkarnama
Published on
Updated on

Farmer Agitation : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. या आंदोलनामुळे केंद्र सरकारवर पुन्हा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. अशात शेतकऱ्यांच्या आंदोलनात माओवादी सक्रिय झाल्याची गोपनीय माहिती महाराष्ट्र नक्षलविरोधी पथकाने सरकारला कळविली आहे. आंदोलनात माओवाद्यांच्या सहभागामुळे या आंदोलनाला हिंसक वळण लागणार नाही, याची काळजी आता सरकाला घ्यावी लागणार आहे.

महाराष्ट्र नक्षलविरोधी विभागाचे महानिरीक्षक आयपीएस संदीप पाटील यांनी याबाबत सांगितले की, दिल्लीच्या शेतकरी आंदोलनात माओवाद्यांचा सहभाग असल्याची गोपनीय माहिती मिळाली आहे. गेल्यावेळी झालेल्या आंदोलनात दर्शपाल सिंह हा किसान मोर्चाचा नेता सहभागी झाला होता. दर्शनपाल सिंह पूर्वी माओवाद्यांच्या केंद्रीय कार्यकारिणीत कार्यरत होता. त्याला कार्यकारिणीतून निलंबित करण्यात आले होते. अशा दर्शनपालने गेल्यावेळी आंदोलनात सगळ्यात पुढे होता. यावरून शेतकरी आंदोलनात किती माओवादी सक्रिय असतील याची कल्पना करता येते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

IPS Sandip Patil
IPS Transfer : कर्तबगारीचे बक्षीस!! संदीप पाटील नक्षल विरोधी अभियानाचे ‘आयजी’

माओवाद्यांचा केंद्रीय कार्यकारिणी दर्शनपाल याने यापूर्वी दिल्लीत झालेल्या शेतकरी आंदोलनात अनेकांना गोळा केले होते. दर्शनपालच्या जवळ असलेले लोक नेमके कोणते प्लानिंग करीत होते, याचा विचार करणे गरजेचे असल्याचे पाटील म्हणाले. पंजाब-हरियाणामध्ये किसान मोर्चाच्या नावाने माओवाद्यांचे चांगले ‘फ्रंटल नेटवर्क’ कार्यरत आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. लवकरच लोकसभा निवडणूक होत आहे. निवडणुकीपूर्वी सरकारला बदनाम करण्यासाठी अचानक आंदोलन सुरू करण्यात आल्याचा संशय संदीप पाटील यांनी व्यक्त केला. आंदोलन चिघळविण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर केला जाऊ शकतो. त्यातून हिंसाचाराची शक्यता वर्तविली जात असल्याचेही पाटील म्हणाले. माओवाद्यांनी हा कट रचल्याचा दाट संशय त्यांनी व्यक्त केला. सत्ताधारी आणि विरोधक दोघेही माओवाद्यांचे शत्रू आहेत. मात्र, गेल्या आंदोलनावेळी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात करण्यात आलेल्या विरोधाला यश मिळाले होते.

शेतकऱ्यांनी गेल्यावेळी केलेल्या आंदोलनानंतर अनेक माओवाद्यादी नेते अचानक भूमिगत झाले होते. त्यांनी छुप्या पद्धतीले ‘नेटवर्क’ उभारत काम सुरू केले होते. अशात आता त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनात घुसखोरी केल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे. देशातील कोणत्याही कोपऱ्यात सरकारविरोधात आंदोलन होत असेल, तर त्यात माओवाद्यांचा कुठेना कुठे सहभाग असतोच, हे आतापर्यंत अनुभवायला आले आहे. त्यामुळे दिल्लीतील आंदोलनादरम्यानही सरकारी यंत्रणेला सतर्क राहावे लागणार आहे

IPS Sandip Patil
IPS Transfer : होय! अंकित गोयल तेच ज्यांनी मिलिंद तेलतुंबडेंसह 26 माओवाद्यांचा खात्मा केला!

निवडणुकीपूर्वी ‘हाय अलर्ट’

महाराष्ट्र नक्षलविरोधी पथकाचे कामकाज आतापर्यंत अनेक प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर सुरू होते. अशात संदीप पाटील यांच्यासारख पूर्ण वेळ अधिकारी आता या विभागाला मिळाल्याने शहरी माओवाद्याच्या मुसक्या आवळण्याचे काम आता वेगाने सुरू झाले आहे. संदीप पाटील हे माओवादग्रस्त गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक होते. गडचिरोली परीक्षेत्र उपमहानिरीक्षक (DIG) पदावरही पाटील यांनी सेवा दिली आहे. अशात पाटील हेच आता महानिरीक्षक (IG) झाल्याने माओवाद्यांच्या चळवळीला आता राज्यात हादरे बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Edited By : Prasannaa Jakate

R

IPS Sandip Patil
Naxal Encounter : वांगेतुरीजवळ पोलिसांपुढे शस्त्र टाकत पळाले माओवादी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com