Gadchiroli Police : छत्तीसगड-महाराष्ट्र सिमेवर गडचिरोली असलेल्या वांगेतुरीजवळ पेालिस व माअवोद्यांमध्ये चकमक उडाली. पोलिसांचा वाढता दबाव पाहता माओवाद्यांनी जंगलात पळ काढला. चकमकीनंतर राबविण्यात आलेल्या शोधमोहिमेत मोठ्या प्रमाणावर स्फोटके जप्त करण्यात आलीत. पोलिसांनी गेल्या काही दिवसात केलेल्या अनेक कार्यवाईनंतर गडचिरोलीतील माओवाद्यांचे चांगलेच खच्चीकरण झाले आहे.
गडचिरोलीचे पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांना नुकतीच पदोन्नती देण्यात आली आहे. पाटील आता नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या पुढाकारातून जिल्ह्याच्या सिमावर्ती भागात पोलिसांनी रात्रंदिवस एक करीत 24 तासात पोलिस चौक्या उभारल्या आहेत.
जिल्ह्यातील माओवादी चळवळीचा खातमा करण्यासाठी पोलिस प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. अशात पोलिसांकडून गेल्या काळात अनेकदा कारवाई केल्यानंतर माओवादी चळवळीला मोठा फटका बसला आहे. वांगेतुरीपासून सात किलोमीटर अतंरावर असलेल्या हिदूर गावात विध्वंसक कारवाईसाठी माओवादी रेकी करीत असल्याची माहिती नक्षलविरोधी पथकाला मिळाली.
माओवादी वांगेपल्ली व गर्देवाडा या 24 तासात उभारलेल्या पोलिस स्टेशनवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्यााचे पोलिसांच्या लक्षात आले. याबाबतची माहिती मिळताच नक्षलविरोधी अभियान पथक ‘अलर्ट’ मोडवर आले. अपर पोलिस अधीक्षक यतीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सी-60 पथकाने शोधमोहिम सुरू केली. पथक हिदूर गावाजवळ पोहचले तेव्हा माओवाद्यांकडून त्यांच्यावर गोळीबार सुरू झाला. पोलिसांनी या गोळीबाराला जबर प्रत्युत्तर दिले. आपली बाजू कमकुवत झाल्याचे लक्षात येताच माओवाद्यांनी अंधाराचा फायदा घेत जंगलातून पळ काढला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
चकमकीनंतर नक्षलविरोधी पथकाने संपूर्ण परिसरात शोधमोहिम राबविली. यावेळी त्यांना मोठ्या प्रमाणावर साहित्य आढळून आले. यात पिट्टु, स्फोटके, अभियानाचे साहित्य, वायरचे बंडल, आयईडी बॅटरी, डिटोनेरर्स, क्लेमोर माइन्सचे हुक, सोलर पॅनल व इतर साहित्य आढळून आले. पोलिसांनी हे साहित्य जप्त केले आहे. गेल्या काळात झालेल्या अनेक चकमकींमुळे माओवादी चळवळीला मोठा हादरा बसला आहे. माओवाद्यांचे अनेक महत्त्वाचे नेते व सदस्य मारले गेल्याने त्यांच्या हालचाली मंदावल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.