Gadchiroli : माओवाद्यांकडून हत्यासत्र सुरूच; आणखी एकाचा गळा दाबला

Naxal Killing : कंत्राटदारांकडून वसूल करीत होता चळवळीच्या नावाखाली खंडणी
Gadchiroli Naxal.
Gadchiroli Naxal.Google
Published on
Updated on

Extortion Money : माओवादी चळवळीच्या नावाखाली कंत्राटदारांकडून खंडणी वसूल करणाऱ्या एका इसमाची गळा दाबत हत्या करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कोरचीपासून सुमारे 14 किलोमीटरवर असलेल्या मुरकुटी गावात ही खळबळजनक घटना घडली.

गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी कारवायांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा एकदा वाढ झाली आहे. एटापल्ली तालुक्यातील खाण प्रकल्पांना होत असलेल्या विरोधाच्या आगीत तेल ओतण्याचं कामही माओवादी करीत आहेत. त्यासाठी त्यांनी काही आदिवासी नेत्यांना हाताशी धरल्याचा आरोप आहे. अशात गेल्या दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात हत्यासत्र पुन्हा एकदा सुरू झाले आहे. (Naxal Killed Person In Murkuti Village Of Gadchiroli For Recovery Of Extortion Money From Contractors)

Gadchiroli Naxal.
Gadchiroli News तोडगट्टाजवळ पोलिसांना घेरल्यानंतर संपूर्ण एटापल्लीत दोन आठवड्यांसाठी कलम १४४ लागू

रविवारी (ता. 3) सकाळी कोरची पोलिस स्टेशनपासून 14 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुरकुटी गावात हत्येचा हा प्रकार घडला. माओवादी गावात शिरले व त्यांनी गडचिरोली-गोंदिया सीमेवर चमरा मडावी (रा. मुरकुटी) याची गळा दाबत हत्या केली. हत्येनंतर माओवाद्यांनी मडावी यांच्या मृतदेहाजवळ एक पत्रही सोडले.

मडावी कट्टर माओवादी समर्थक होता. त्याची बहीण एमएमसी परिसरातील विस्तार प्लाटून तीनची माओवादी सदस्य असून, एका डिव्हिजनल कमिटी मेंबरची (DVCM)पत्नीही आहे. मडावी हा माओवाद्यांना बंदुकींसाठी राऊंड पुरवायचा. या प्रयत्नात असताना त्याला गेल्या वर्षी मध्य प्रदेशात बालाघाट येथे अटक करण्यात आली होती. त्यानंतर तो तुरुंगात होता. काही महिन्यांपूर्वीच त्याची तुरुंगातून सुटका झाली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गडचिरोलीत परतल्यानंतर मडावी हा माओवादी चळवळीच्या नावाखाली कंत्राटदारांकडून खंडणी वसूल करीत होता. मात्र, खंडणीची रक्कम चळवळीला न देता त्याचा वापर तो स्वत: करीत होता. ही माहिती मिळाल्यानंतर माओवादी चळवळीतील नेत्यांनी त्याला गावातून उचलून नेले. त्याच्याकडून सत्य वदवून घेतल्यानंतर माओवाद्यांनी त्याची गळा दाबत हत्या केली. मडावी पोलिसांना चळवळीबद्दल माहिती देत माओवाद्यांना ‘डबल क्रॉस’ करीत असल्याचेही पत्रात नमूद केले आहे.

अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोलीच्या दौऱ्यावर होते. शिंदे गडचिरोलीतून परत जात नाही, तोच माओवांद्यांनी एकापाठोपाठ हत्यासत्र सुरू केलं आहे. हत्या करण्यात आलेल्या सर्वच पोलिसांचे खबरी होते, असा संशय माओवाद्यांना होता. सध्या एटापल्ली तालुक्यातील तोडगट्टा येथे खाणी विरोधी आंदोलन सुरू आहे. गेल्या अडीचशे दिवसांपासून हे आंदोलन कायम आहे. या आंदोलनाला पेटविण्याचं कामही माओवादी करीत आहेत. त्यातूनच तोडगट्टाजवळ आंदोलकांनी पोलिसांना घेरलं होतं.

Edited by : Prasannaa Jakate

Gadchiroli Naxal.
Nagpur Naxal Threat : मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना धमकीचे सत्र सुरूच

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com