केतकीला दोन वर्षापूर्वीची पोस्टही भोवणार? ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

केतकी चितळेला (Ketki Chitale) 18 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Ketki Chitale
Ketki Chitalesarkarnama

नागपूर : अभिनेत्री केतकी चितळेने (Ketki Chitale) वादग्रस्त पोस्ट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविषयी गरळ ओकली आहे. याप्रकरणी ठाणे पोलिसांनी शनिवारी केतकीला अटक केली होती. त्यानंतर रविवारी सकाळी तिला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी तिला 18 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, यानंतर आता तिच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. केतकीवर ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. (Ketki Chitale Latest News)

Ketki Chitale
पवारांबद्दलच्या मतावर ठाम! पोस्ट डिलीट करणार नाही : केतकी चितळेने स्पष्टच सांगितले

केतकी चितळे वादग्रस्त पोस्ट मुळेच जास्त चेर्चेत असते. तीने दोन वर्षापुर्वी १ मार्च २०२० मध्ये एक पोस्ट केली होती. त्या पोस्टमुळेही केतकीच्या अडचणीत वाढण्याची शक्यता आहे. नवबौद्धच्या भावना दुखावल्याबद्दल नागपूर (Nagpur) येथील कपिल नगर पोलीस स्टेशन येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश महासचिव वर्षा शामकुळे यांनी केतकी विरोधात ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Ketki Chitale Post
Ketki Chitale Postsarkarnama

केतकी चितळे हिने १ मार्च २०२० रोजी 'नवबौद्ध 6 डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात तो धर्म विकासासाठीचा हक्क' अशी फेसबुक पोस्ट केली होती. त्यामुळे बौद्ध बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या. केतकी चितळे यांच्यावर कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची वर्षा शामकुळे यांनी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यामुळे केतकीच्या अडचणी वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.

Ketki Chitale
केतकीच्या अडचणीत वाढ;वारकरी संप्रदायाकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी

दरम्यान, केतकीने न्यायालयात बाजू मांडण्यासाठी वकील घेतला नाही. तिने स्वत:च न्यायालयात बाजू मांडली. मी पोस्ट केवळ फॉरवर्ड केली आहे. सोशल मीडियात मत मांडण्याचा आपल्याला अधिकार नाही का, असा सवाल तिने न्यायालयात उपस्थित केल्याचे समजते. त्यानंतर तिला कोठडी सुनावण्यात आली. केतकी विरोधात ठाण्यातील कळवा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता नुसार कलम 500, 501, 505, 153-A अशा कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष/जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल नेटके यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com