केतकीच्या अडचणीत वाढ;वारकरी संप्रदायाकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी

Ketaki Chitale |Sharad Pawar| केतकीने अध्यक्ष शरद पवारांविरोधात जी कविता पोस्ट केली, त्यात 'तुका म्हणे' असा उल्लेख केला आहे.
Ketaki Chitale
Ketaki Chitale

Ketaki Chitale News Updates

पिंपरी-चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांबाबत (Sharad Pawar) वादग्रस्त फेसबुक पोस्ट करणारी अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये संत तुकाराम महाराज संस्थानने केतकीवर गुन्हा दाखल करायची मागणी केली आहे. यासाठी संस्थानच्या विश्वस्तांनी पिंपरी चिंचवड पोलिसांकडे (Police) तसा तक्रार अर्जही दाखल केला आहे.

Ketaki Chitale
केतळी चितळेला न्यायालयाकडून दणका; स्वत:च मांडली बाजू

केतकीने शरद पवारांविरोधात जी कविता पोस्ट केली, त्यात 'तुका म्हणे' असा उल्लेख केला आहे. 'तुका म्हणे' या शब्दांचा उल्लेख करून केतकीने वादग्रस्त आणि विडंबनात्मक लेखन केलं आहे. 'तुका म्हणे' ही संत तुकाराम महाराजांची नाममुद्रा आहे. 'तुका म्हणे' हे शब्द महाराजांच्या सर्व अभंगांची स्वाक्षरी आहे. त्यामुळे कोणत्याही संताच्या अभंगाचा किंवा त्यातील ओळींचा अशा पद्धतीने केलेला वापर केला खपवून घेणार नाही. भविष्यात अशी कोणीच चूक कोणी करू नये म्हणून केतकी चितळेवर गुन्हा दाखल करावा आणि कारवाई करावी, अशी मागणी तक्रार अर्जात संस्थानच्या वतीने करण्यात आली आहे.

दरम्यान, वादग्रस्त पोस्ट प्रकरणी ठाणे पोलिसांनी शनिवारी ( १४ मे) केतकीला अटक केली. त्यानंतर रविवारी सकाळी तिला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी तिला 18 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. केतकीने न्यायालयात बाजू मांडण्यासाठी वकील घेतला नाही. तिने स्वत:च न्यायालयात बाजू मांडली. मी पोस्ट केवळ फॉरवर्ड केली आहे. सोशल मीडियात मत मांडण्याचा आपल्याला अधिकार नाही का, असा सवाल तिने न्यायालयात उपस्थित केल्याचे समजते. त्यानंतर तिला कोठडी सुनावण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com