Sharad Pawar, Uddhav Thackeray : 'उद्धव ठाकरेंची शिवसेना अन् शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पुन्हा ठिकऱ्या उडणार'

Chitra Wagh In Bhnadara : महाराष्ट्रात गतिशील आणि संवेदनशील सरकार असल्याने लोकांच्या 'फेस'वर स्माइल
Sharad Pawar, Uddhav Thackeray
Sharad Pawar, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Bhandara Political News : राज्यातील उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुन्हा ठिकऱ्या उडणार आहेत. या दोन्ही गटांत आणखी फूट पडणार असल्याचे भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी भाकीत वर्तवले आहे. भंडारा जिल्ह्याच्या साकोली येथील एका कार्यक्रमात वाघ यांनी विरोधकांवर घणाघात केला. (Latest Political News)

भंडारा जिल्ह्याच्या साकोलीमध्ये दोनदिवसीय वैनगंगा पांगोली खासदार सांस्कृतिक महोत्सव पार पडला. या कार्यक्रमाच्या समारोपात रविवारी चित्रा वाघ (Chintra Wagh) यांनी ठाकरे गटाला चांगलेच फैलावर घेतले. 'महाराष्ट्रातील फेसबुकवर चालणारे सरकार जाऊन, लोकांच्या 'फेसवर स्माइल' आणणारे सरकार आले आहे. कुणालाही चिंता करण्याची गरज नाही. महाराष्ट्रात गतिशील आणि संवेदनशील सरकार असल्याने लोकांच्या फेसवर स्माइल येणारच,' असे चित्रा वाघ म्हणाल्या.

Sharad Pawar, Uddhav Thackeray
NCP Crisis : शरद पवार-अजितदादा आमनेसामने; सर्वोच्च न्यायालय अन् निवडणूक आयोगात आज सुनावणी

दरम्यान, वाघ यांनी शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही निशाणा साधला. सुप्रिया सुळे यांनी भाजपकडे १०५ आमदार असतानाही देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री होता आले नाही. त्यांची दया येते, असेही वक्तव्य केले होते. त्यावर चित्रा वाघ म्हणाल्या, 'सुप्रियाताई आपण आपले पक्षाचे बुड़ते जहाज सांभाळा. आमच्यावर टीका करण्याच्या नादात आपल्यामागचे लोक आमच्याकडे येतील,' असा इशारा वाघ यांनी सुळेंना दिला आहे.

राज्यातील राजकीय स्थितीबाबत काहीही सांगता येत नसताना राजकीय वर्तुळातून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. यात कुठलाही पक्ष मागे राहिलेला दिसत नाही. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी फुटल्याने राज्यात कुठले सरकार आहे, याबाबत लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. यातच चित्रा वाघ यांनी ठाकरे गट आणि राष्ट्रवादीत आणखी फूट पडणार असल्याचे भाकीत केले. यामुळे राज्यात चर्चांना उधाण आले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Sharad Pawar, Uddhav Thackeray
Supriya Sule on Hasan Mushrif : मुश्रीफांना वॉशिंग मशीनमध्ये घालून पालकमंत्री केले का? सुप्रिया सुळे कडाडल्या, म्हणाल्या...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com