Nagpur NCP Office News : काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी काचिपुऱ्यातील बजाजनगर चौकानजीक असलेल्या प्रशांत पवार यांनी सुरू केलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात पत्रकार परिषदा घेतल्या. पण या जागेला महापालिकेने नोटिस बजावताच पेठेंनी घूमजाव केले. ते कार्यालय आमचे नव्हेच, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद असल्याचे बोलले जात आहे.
बजाजनगर काचिपुरा येथील भूखंडधारकांना महापालिकेने नोटीस बजावताच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी चांगलेच धास्तावले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी तडकाफडकी पत्र काढून जाहीर केले आहे. यावरून राष्ट्रवादीत मतभेद निर्माण झाले असून पेठे यांना प्रशांत पवार यांच्यासोबत संबंध तोडायचे असल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या गोटात सुरू आहे.
यापूर्वी महापालिकेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे संपर्क प्रमुख मंगेश काशीकर यांनाही नोटीस पाठवली होती. मात्र त्याचा कोणीच बाऊ केला नाही. दरवर्षीच मार्च महिना जवळ आल्यावर महापालिका नोटीस पाठवते, असे येथील लोकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे या जागेबाबत न्यायालयात वाद सुरू आहे.
ही जागा पीकेव्ही आपली असल्याचा दावा करीत आहे, तर दुसरीकडे स्वातंत्र्याच्या आधीपासून आम्ही येथे शेती करीत असल्याचे काचिपुऱ्यातील नागरिकांचे म्हणणे आहे. जागेच्या वादावर अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. स्थानिकांनी रस्त्याशी लगत असलेल्या जागा भाड्याने दिल्या आहेत.
महापालिकेमार्फत जागा मालकांना नोटीस बजावण्याऐवजी भाडेकरूंना नोटीस बजावली आहे. यावरूनही मतभेद आहेत. विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनाला स्वतः शरद पवार यांच्यासह विदर्भाचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. एवढेच नव्हे तर स्वतः दुनेश्वर पेठे, जिल्हाध्यक्ष बाबा गुजर, माजी मंत्री रमेश बंग, नागपूरचे समन्वयक राजू जैन यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. प्रशांत पवार यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय कार्यालय असा मोठा फलकही लावण्यात आहे.
कार्यालयासमोर लावलेल्या फलकावर नेत्यांचे फोटोसुद्धा आहेत. शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्वाक्षरी केलेला एक फोटोही कार्यालयात आहे. दुनेश्वर पेठे यांनीसुद्धा काही पत्रकार परिषदा येथे घेतलेल्या आहेत. पण आता त्यांनी भूमिकेवरून घूमजाव केले आहे. जर हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) कार्यालय नव्हते, तर त्यांनी येथे पत्रकार परिषदा कशा काय घेतल्या, असा प्रश्न उपस्थित होतो. पक्षाच्या अधिकृत गणेशपेठ येथील कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषदा का घेतल्या नाही, असाही प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये चर्चिला जात आहे.
बजाजनगर येथे प्रशांत पवारांचे खाजगी कार्यालय आहे. महापालिकेने राष्ट्रवादीला कुठलीही नोटीस दिली नाही. ती प्रशांत पवार यांना दिली आहे. येथील जागेवरील बांधकाम अवैध नसेल, तर प्रशांत पवार महापालिकेला (Municipal Corporation) कागदपत्रे सादर करतील. या नोटीसचा राष्ट्रवादीशी काही संबंध नाही. तसेच येथे विभागीय कार्यालय नव्हतेच. फक्त फलकांचे उद्घाटन शरद पवार यांनी केले होते. नागपूर (Nagpur) शहरात असे दोनशे फलक आहेत, असे दुनेश्वर पेठे यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.